Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#इकडे लक्ष द्या : ‘आयबुप्रोफेन’ स्वतः घेऊ नका , कोरोना व्हायरसला मिळते चालना , जागतिक आरोग्य संघटनेचे आवाहन

Spread the love

‘करोना’ विषाणूच्या (कोविड-१९) संसर्गाची लक्षणे जाणवू लागलेल्या लोकांनी आपणहून ‘आयबुप्रोफेन’ या औषधाचे सेवन करणे टाळावे, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केले आहे. या औषधाच्या सेवनामुळे करोना विषाणूचे दुष्परिणाम अधिकच बळावत असल्याचे फ्रान्सचे आरोग्यमंत्र ऑलिव्हर व्हेरन यांनी सांगितल्याच्या पार्श्वभूमीवर ‘डब्ल्यूएचओ’ने हे आवाहन केले आहे.

लॅन्सेट या साप्ताहिक वैद्यकीय नियतकालिकामध्ये याविषयीचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. यावर अधिक सखोल अभ्यास सुरू असून तोपर्यंत आपणहून या औषधाचे सेवन करू नये. त्याऐवजी प्राथमिक लक्षणांसाठी पॅरासिटमॉलचे सेवन करण्यास हरकत नाही, अशी माहिती डब्ल्यूएचओचे प्रवक्ते ख्रिस्टियन यांनी गुरुवारी दिली. डॉक्टरांनी आयबुप्रोफेनचे सेवन सांगितल्यास ते करण्यास हरकत नसल्याचेही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वीच व्हेरन यांनीही यासंबंधीचे ट्विट केले होते. पॅरासिटमॉलचे सेवनही मर्यादेत करावे, पॅरासिटमॉलचे अतिसेवन यकृतासाठी खूपच हानिकारक ठरू शकते, असेही ते म्हणाले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!