Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोरोनाच्या दहशतीने गावाकडे निघाले खरे पण आईसह दोन चिमूल्यांना मृत्यूने गाठलेच !!

Spread the love

पुण्याहून कोरोनाच्या भीतीने गावाकडे निघालेल्या आईसह दोन चिमुकल्या अपघातात सापडून तिघींचाही करून अंत झाला. कोरोना व्हायरसने पुण्यात आपले हात पाय पसरल्याने कोरोनाची धास्ती घेऊन पुणे येथून लोहारा तालुक्यातील आपल्या निघालेल्या कुटुंबियांच्या  कारला कंटेनरची जोराची धडक दिली आणि या भीषण अपघातात कारचालकासह आई आणि तिच्या दोन मुली जागीच ठार झाल्या. या अपघाताचे वृत्त समजताच परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी सायंकाळी ४ च्या सुमारास लोहारा तालुक्यातील खेड पाटीजवळ हा अपघात घडला. या अपघातातील इतर पाचजण गंभीर  जखमींना उस्मानाबाद आणि सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याविषयीची अधिक माहिती अशी कि , लोहारा तालुक्यातील माकणी येथील नारायण साठे व सतीश पवार हे कामानिमित्त पुणे येेथे वास्तव्यास गेले होते. दरम्यान पुणे शहरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने  पुण्यातील नागरिकांमध्ये  दहशत निर्माण झाली आहे.  त्यामुळे नोकरी व कामानिमित्त पुणे, मुंबईसह इतर शहरात गेलेले तालुक्यातील अनेक नागरिक आपापल्या गावांकडे परतू लागले आहेत. त्यात नारायण साठे व सतीश पवार हे दोन्ही कुटुंबिय एकाच कारने पुण्याहून लोहारामार्गे माकणीकडे निघाले होते.

दरम्यान त्यांचे गाव अवघे तीन ते चार किलोमीटर अंतरावर आलेले असताना खेड पाटीजवळ शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास माकणीहून येणार्‍या कंटेनरची (एमएच १३/ आर १२८७) व कारची (एमएच १२/ पीएच ६३२६) समोरासमोर जोराची धडक बसली. यात चालक नेताजी मनोहर मोरे (वय २८) यांच्यासह मनिषा नारायण साठे (वय ३२), वैष्णवी नारायण साठे (वय १२), वैभवी नारायण साठे (वय ८ सर्व रा. माकणी) हे चौघे जण जागीच ठार झाले. तर नारायण हरीदास साठे (वय ३६), त्यांचा मुलगा हरीश नारायण साठे (वय २), शीतल सतीश पवार (वय ३०), संस्कृती सतीश पवार (वय ६), वेदांत सतीश पवार (वय ३) असे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील हरीश साठे, शीतल पवार यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला तर शीतल पवार (वय ३०), संस्कृती पवार (वय ६), वेदांत पवार (वय ३) यांना उस्मानाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!