Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : कनिकाच्या कोरोनाने राष्ट्रपती भवनही संशयाच्या विळख्यात, राष्ट्रपतींचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

Spread the love

कोरोनाबरोबरच बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिला भेटणारे भाजप खासदार दुष्यंत कुमार यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतल्यानंतर आता राष्ट्रपती कोविंद यांनाही करोनाचा धोका असल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. देशभरात करोना व्हायरसची  दहशत वाढत असताना आता या  व्हायरसची भीती राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली असून खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आपली वैद्यकीय तपासणी करून घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.

देशभरात कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सर्व स्तरावर खबरदारीचे उपाय शोधले जात असतानाच बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिच्या उत्तर प्रदेशाती पुढाऱ्यांच्या भेटीत  भारतीय जनता पक्षाचे खासदार दुष्यंत सिंह यांनी संसद भावनाबरोबरोबरच  राष्ट्रपती भवनात अन्य नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. यामुळे  राष्ट्रपती भवनापर्यंत कोरोनाची थाप गेली कि काय ? असा संशय निर्माण झाल्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपली वैद्यकीय तपासणी करून घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयासोबतच राष्ट्रपती कोविंद यांनी आपले सर्व नियमित कार्यक्रम स्थगित केले असल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार दुष्यंत सिंह हे गायिका कनिका कपूर हिच्या पार्टीत सहभागी झाले होते. कनिका कपूर हिला नंतर करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर खासदार दुष्यंत कुमार क्वारंटाइन झाले. मात्र, कनिकाच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याचे कारण म्हणजे खासदार दुष्यंत कुमार हे संसदेत येत होते. त्या दरम्यान त्यांनी अनेक खासदार, नेते आणि राष्ट्रपतींचीही भेट घेतली. खासदार दुष्यंत सिंह यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची १८ मार्च या दिवशी राजभवनात भेट घेतली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यस्थान आणि उत्तर प्रदेशातील खासदारांसमवेत राष्ट्रपती भवनात बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीदरम्यान राष्ट्रपती कोविंद आणि खासदार दुष्यंत सिंह यांची भेट झाली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रपती भवनातही खबरदारी घेतली आजच्या आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!