Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : जनता का कर्फ्यू : प्रवाशांनो , इकडे लक्ष द्या… इंडियन रेल्वेने घेतला मोठा निर्णय !!

Spread the love

भारतीय रेल्वेनेही देशभरातील करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर  रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. रेल्वेने २१ मार्चच्या मध्यरात्रीपासून २२ मार्च रात्री १० वाजेपर्यंत धावणाऱ्या सर्व पॅसेंजर ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्या गाड्या सकाळी ७ वाजता सुटलेल्या असतील त्या आपल्या शेवटच्या स्थानकापर्यंत विनाअडथळा पोहोचणार आहेत. दरम्यान गो एअर नेही जनता का कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे.

भारतीय रेल्वेने म्हटले आहे कि , या व्यतिरिक्त, मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनमधील कॅटरिंगची सुविधा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील अशी घोषणा भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (IRCTC) केली आहे. फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम, जन आहार आणि सेल किचनही बंद राहील, असे आयआरटीसीने स्पष्ट केले आहे. या पूर्वी दररोज स्वच्छ केले जात नसल्यामुळे ट्रेनमध्ये ब्लँकेट दिली जाणार नाहीत असे पश्चिम रेल्वेनेही जाहीर केले होते. यामुळे प्रवाशांनी आपल्या घरूनच ब्लँकेट्स आणावीत असे आवाहनही रेल्वेने केले होते.

दरम्यान प्रवाशांची कमी संख्या आणि करोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता २० ते ३१ मार्च दरम्यान धावणाऱ्या ९० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी ही माहिती सूत्रांनी दिली. या बरोबरच रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची संख्या २४५ वर पोहोचली आहे. या पूर्वी गुरुवारी रेल्वेने ८४ गाड्या रद्द केल्या होत्या. विशेष म्हणजे ज्या लोकांनी या रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची तिकीट बुक केली आहेत अशा प्रवाशांना या निर्णयाची व्यक्तिगत माहिती देण्यात येत नसल्याचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले. मात्र, या गाड्यांची तिकिटे रद्द करण्याचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रवाशांना त्यांचे पूर्ण पैसे मिळणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचविल्याप्रमाणे सोशल डिस्टन्स ठेवणे आवश्यक असल्याचे भारतीय रेल्वेने म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!