कोरोनामुळे लॉकड डाऊन झालेल्या फिलीपीन्समधून मोदी सरकार आणि राज्य सरकारला विद्यार्थिनीचे पत्र….

Advertisements
Advertisements
Spread the love

कोरोनामुळे लॉकड डाऊन झालेल्या फिलीपीन्समधून आमची सुटका करा, या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आम्हाला या संकटातून सोडवा अशी आर्त हाक फिलीपीन्समधल्या मनिला येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे. सध्या फिलीपीन्समध्ये २ हजार भारतीय विद्यार्थी अडकून पडले असून त्यापैकी सुमारे २५० विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत असे  सिमरन गुप्ते या विद्यार्थिनीने यासंदर्भात मोदी सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला लिहिलेल्या पात्रात कळविले आहे. त्या पत्रात मनिला आणि फिलीपीन्समध्ये काय परिस्थिती आहे हे विशद केलं आहे. सिमरन गुप्ते आणि तिची बहीण सानिया गुप्ते या दोघीही फिलीपीन्समध्येच अडकल्या आहेत.

Advertisements

या पात्रात तिने म्हटले आहे कि , “मी सिमरन गुप्ते आणि माझी बहीण सानिया आम्ही दोघीही फिलीपीन्स येथील लास पिनास येथील मनिला मध्ये राहतो. आम्ही शिक्षणासाठी इथे आलो आहोत. वैद्यकीय विषयाचं शिक्षण हे आम्ही येथील University of Perpetual Help System Dalta , Las Pinas campus मध्ये घेत आहोत. मात्र मला एक मुद्दा प्रकर्षाने या ठिकाणी मांडायचा आहे तो आहे की या ठिकाणी करोनाग्रस्तांची संख्या २३० झाली आहे. तर करोनाची लागण झाल्याने १७ जणांचा मृत्यू झाला आहे. आम्ही साधारपणे २ हजार विद्यार्थी या ठिकाणी अडकून पडलो आहोत. या २ हजार विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २५० विद्यार्थी हे महाराष्ट्रातील आहेत. आम्ही १८ आणि १९ मार्च रोजी भारतात येण्यासाठीची विमानाची तिकिटं बुक केली होती. कारण फिलीपीन्स सरकारने आम्हाला ७२ तासांमध्ये देश सोडण्याची मुभा दिली होती. मात्र भारत सरकारने १७ मार्चला एक आदेश काढला ज्यानुसार ३१ मार्च पर्यंत १२ देशांमधल्या प्रवाशांना येण्यास मज्जाव केला आहे. फिलीपीन्स ब्लॅक लिस्टेड झाले आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी अडकून पडलो आहोत.”

Advertisements
Advertisements

“मनिला या शहरात १० मार्च ते १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घेण्यात आला आहे. भारतीय पासपोर्ट असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला आमच्याकडे १० ते १२ दिवस पुरेल इतके अन्न आणि पाणी आहे. मात्र त्यानंतर परिस्थितीला कसं सामोरं जायचं हा आमच्यापुढे असलेला प्रश्न आहे. फिलीपीन्समध्ये थांबणं हे अत्यंत ‘रिस्की’ वाटू लागलं आहे जेव्हा काही वेळासाठी इथली संचारबंदी शिथील केली जाते तेव्हा आमच्याकडे अन्नपदार्थ खरेदी करण्याचेही मर्यादित पर्याय आहेत. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करते की कृपा करुन लवकरात लवकर आम्हाला येथून सोडवा आणि भारतात आणा. तुम्हा सगळ्यांवर आमचा विश्वास आहे. तुम्ही आम्हाला या संकटातून सोडवाल अशी आशा आहे.” या आशयाचं पत्रच सिमरन गुप्तेने . आता मोदी सरकारकडून आणि महाराष्ट्र सरकारकडून या सगळ्यांना सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

आपलं सरकार