Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : कोरोना व्हायरस बाबतच्या सूचना घंटागाडी वर ऑडीओ द्वारे द्या- भाकप

Spread the love

कोरोना व्हायरस बाबतच्या सुचना घंटागाडी वर ऑडीओ द्वारे द्या सह अनेक मागण्यांचे निवेदन भाकप ने दिले. त्यावर महापौरांनी उद्या पासूनच अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
जगभरात कोरोना व्हायरसचे संकट घोंघावत आहे, औरंगाबादेतही कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. कोरोना बाधीत रुग्ण 700 लोकांच्या संपर्कात येईपर्यंत प्रशासन सुस्त राहिले. विमानाने प्रवास करुन ऊतरणार्या प्रवाशांना योग्य प्रकारे तपासले जात नाही, हे यावरून दिसून येते. शहरातील आरोग्याची काळजी घेणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. महानगरपालिकेची यंत्रणा अजुनही या संकटाला तोंड देण्यास सज्ज असल्याचे दिसून येत नाही.
कोरोना व्हायरस संदर्भात घ्यावयाची काळजी घेण्याची सुचना घंटा गाडी वर ऑडीओ द्वारे वारंवार देण्यात याव्यात, कोरोना प्रतिबंधक फवारणी संपुर्ण शहरात करण्यात यावी, ठीकठीकाणी चौकात मनपा तर्फे हॅण्डवाॅश , सॅनिटायझर ऊपलब्ध करुन देण्यात यावा, मनपा आयुक्त लोकांना भेटणार नसतील तर त्यांचा मोबाईल क्रमांक सार्वजनिक करावा व त्यावर दिलेल्या तक्रारीचा निपटारा 12 तासात झाला पाहिजे ही आपत्कालीन परिस्थितीची गरज आहे, वेगवान प्रशासनाची शहराला गरज आहे, संपुर्ण शहरात स्वच्छता ठेवावी, कचर्याचे योग्य वर्गीकरण करावे, सफाई कामगारांना सुरक्षा कीट देण्यात यावे, त्यांची योग्य काळजी घेण्यात यावी, सफाई कामगारांचा व कोरोना संबंधित कामे करणार्या कर्मचार्यांचा 1कोटी रुपयांचा विमा मनपा तर्फे काढण्यात यावा, त्यांच्या सोबत काही अनुचित घटना घडल्यास मनपा जबाबदार राहील, शहरात मास्क, सॅनिटायझर, हॅण्डग्लोव्हज ईचा काळाबाजार होणार नाही याची काळजी घ्यावी, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी कारण लोक अजुनही हस्तांदोलन करीत आहेत, हात मिळवणी , जवळचा संपर्क टाळत नाहीत, मास्क वापरत नाहीत, वारंवार हात धुण्याच्या सुचना आहेत आणि शहरात अनेक भागात पाणी पुरवठाच नाही हा विरोधाभास आपल्याला मोठ्या संकटात ढकलू शकतो या मागण्यांचे निवेदन महापौर नंदकुमार घोडेले यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आले. या निवेदनावर भाकपचे जिल्हा सहसचिव काॅ अँड अभय टाकसाळ, गजानन खंदारे, बी एम चौधरी, मनोज पवार ई च्या सह्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!