Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : परदेशातील २७६ भारतीयांना करोना व्हायरसची लागण, दिल्लीत कोरोना संशयितांची आत्महत्या

Spread the love

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परदेशात राहणाऱ्या भारतीयांवर केंद्र सरकारचे लक्ष असून परदेशातील २७६ भारतीयांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. यात २५५ जण इराणमध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये १२ आणि इटलीमध्ये पाच जण आहेत. तर हाँगकाँग, कुवेत, रवांडा आणि श्रीलंकेत राहणाऱ्या प्रत्येकी एका भारतीयाला करोनाची लागण झाली आहे. लोकसभेमध्ये आज ही माहिती देण्यात आली. लोकसभेमध्ये बुधवारी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली. दरम्यन आज रात्री उशिरापर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिल्लीतील विमानतळ आणि प्रमुख रुगालयांना भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.

भारत सरकारची कार्यवाही 

दरम्यान भारतात कोरोनाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात ६२ लॅब आणि १०६ सॅम्पल कलेक्शन केंद्र सुरु केले आहेत. या सर्व केंद्रांची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून तशी व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुगल मॅपवर या सर्व लॅब आणि केंद्रांची माहिती उपलब्ध करुन दिली आहे. जगभरात थैमान घालणारा कोरोनाचा संसर्ग भारतातही वाढत चालला असून देशात आतापर्यंत १५० पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचे रुग्ण तत्काळ समजून यावेत यासाठी देशात  लॅब आणि सॅम्पल कलेक्शन केंद्रांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनेही प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत केंद्र सरकारने आपल्या विविध वेबसाईट्सवर माहिती दिली. ही माहिती सर्वसामान्यांना सोयिस्करपणे उपलब्ध व्हावी यासाठी हेल्थ अॅनलिस्टिक एशियाच्या डेटा टीमने संपूर्ण माहिती एकत्र करत गुगल मॅपच्या मदतीने भारताच्या नकाशाव्यावर प्रकाशित केली. त्यामुळे सर्वसामान्यांना सहज ही माहिती उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्रात २ लॅब तर ५ सॅम्पल कलेक्शन केंद्र

गुगल मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे महाराष्ट्रात आजच्या घडीला मुंबई आणि नागपूर येथे लॅब सुरु आहेत. तर औरंगाबाद, धुळे, कोल्हापूर, सोलापूर, अकोला येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सॅम्पल कलेक्शन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे. केंद्र सरकार ज्याप्रकारे उपाययोजना करत आहे ते पाहून इतर देशही भारताचं कौतुक करत आहेत.

कोरोना संशयित रुग्णाची आत्महत्या 

दरम्यान भारतात कोरोना व्हायरस धुमाकूळ घातला आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र दिल्लीत एका कोरोना संशंयित रुग्णाने आत्महत्या केली असल्याचे वृत्त आहे. याबाबत एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, “राजधानी दिल्लीतील सफदरजंग  रुग्णालयात एका कोरोना संशयित रुग्णाने ७ व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली आहे. या रुग्णाला काल दि. १८ रोजी रात्री ९ च्या सुमारास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आत्महत्या केलेला हा रुग्ण सिडनीहून दिल्लीत आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेला हा कोरोना संशंयित रुग्ण गेल्या एका वर्षांपासून सिडनीमध्ये राहतो. रात्री ९ च्या सुमारास डोकं दुखत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अचानक रात्री १०.३० च्या सुमारास या रुग्णाने ७ व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. त्याने ही आत्महत्या नेमकी का केली? त्याला कोरोनाची लागण झाली होती का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!