Aurangabad Crime : परराज्यातील दुचाकी चोर गजाआड

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबादेत  दुचाकी चोरणा-या मध्यप्रदेशातील एकाला गजाआड करण्यात सातारा पोलिसांना यश आले असुन दुचाकी चोराकडून १५ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. हिरालाल गणपत कानोजीया (वय२२, रा. पाडल्या ता. जिरण्या जि. खिरगोन राज्य मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
प्रकरणात कबीर नगर, उस्मानपुरा परिसरात राहणारे अभिजीत अजय साठे (वय २९) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीएस-३५०५) १ पेâब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बीड बायपास रोडवरील हॉटेल टिलु टचच्या पार्कींगमधुन चोरीला गेली होती. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, महिनाभरापुर्वी हॉटेलच्या पार्कींगमधुन दुचाकी चोरणारा हिरालाल कानोजीया हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र मळाळे यांच्या मागदर्शनाखाली डीबी पथकाचे उपनिरीक्षक विक्रांत वडने, सहाय्यक फौजदार मच्छिंद्र ससाने, जमादार सखाराम सानप, कैसर पटेल, प्रदिप ससाने, लांडे पाटील, अभय भालेराव आदींनी सापळा रचून कानोजीया याला अटक केली.

Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार