Aurangabad Crime : सापाचा धाक दाखवून युवकाचा खून करणारा दुसरा आरोपीही गजाआड, जवाहरनगर पोलिसांची कारवाई

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील मैदानात मित्रासोबत बोलत उभ्या असलेल्या युवकाला सापाचा धाक दाखवून त्याला चाकूने भोसकून  खून करणा-या दुस-या आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी बुधवारी (दि.१८) गजाआड केले. सोहेल शेख (वय २५, रा.काबरानगर) असे अटक केलेल्या दुस-या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय महेश प्रधान (वय २३, रा.सुतगिरणी चौक, गारखेडा परिसर) हा युवक सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील मोकळ्या मैदानात अमेय पंडीतराव भोसले (रा.यश चंद्रागण, अपार्टमेंन्ट, दर्गाह रोड, शहानुरवाडी) याच्यासोबत बोलत उभा होता. त्यावेळी दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईटी-१६०५) वर आलेल्या दोन जणांनी सापाचा धाक दाखवून अमय भोसले याच्या जवळील ४०० रूपये हिसकावून घेतले होते. याप्रकरणी पोलिसांीन इम्रान बेग आमिर बेग (वय २५, रा.काबरानगर) याला अटक केली होती. तर दुस-या फरार आरोपी सोहेल शेख याला बुधवारी सकाळी जवाहरनगर पोलिसांनी अटक केली.

Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार