Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MPSC Result : पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत औरंगाबादचा दिलीप वाव्हळ मागास प्रवर्गात राज्यात पहिला

Spread the love

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाचा अंतिम निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. त्यात ३८७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. राज्यात मुलांमधून वैभव नवले तर, मुलींमध्ये दीपाली कोळेकर पहिली आली. या परीक्षेत औरंगाबादचा दिलीप वाव्हळ मागास प्रवर्गातून राज्यात पहिला आला आहे.

एमपीएससीतर्फे ३८७ पदासाठी १३ मे २०१८ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षा दोन सप्टेंबर तर डिसेंबरमध्ये शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. दोन वर्षापासून प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे उमेदवारांचे निकालाकडे लक्ष लागले होते. राज्यात मुलांमधून वैभव नवले २६७ गुण मिळवत पहिला तर, मुलींमध्ये २६१ गुण मिळवत दीपाली कोळेकर ही पहिली आली. औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. मागास प्रवर्गातून दिलीप वाव्हळ हा राज्यात पहिला आला. यासह विकास कदम, ऋषिकेश तळेकर, हर्षद इंगोले, रामेश्वर ढाकणे, हरिदास जंगले, निखिल पवार, गोविंद पवार, सुशील सरनाईक, दीपक खरात, संतोष नागरगोजे आदींसह २५पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ३८७ उमेदवारांमध्ये खुल्या प्रवर्गातील ६६, महिला ३८, क्रीडा दहा, मागास प्रवर्ग ३३, मागास प्रवर्ग महिला १५, ओबीसी ६६, ओबीसी महिला ६६ असा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!