Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बलात्काऱ्याची विधवा म्हणून जगायचे नाही, निर्भया प्रकरणातील एका आरोपीच्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज

Spread the love

बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कारातील  दोषी  नवीनगर येथील लहंग कर्मा गावच्या अक्षय ठाकूरच्या पत्नीने घटस्फोटाची मागणी केली आहे. अक्षय ठाकूरची पत्नी पुनीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पुनिता यांनी औरंगाबाद (बिहार ) फॅमिली कोर्टाचे मुख्य न्यायाधीश रामलाल शर्मा यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अक्षयच्या पत्नीने आपल्या अर्जात असे म्हटले आहे की, ‘माझ्या पतीला बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे आणि त्याला फाशी देण्यात येणार आहे. मात्र मला त्याची विधवा व्हायची इच्छा नाही. त्यामुळे मला घटस्फोट हवा आहे.’ मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात १९ मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

अक्षय ठाकूर यांच्या पत्नीचे वकील मुकेश कुमार सिंह  म्हणाले की, पीडित महिलेला हिंदू विवाह कायदा 1 (2) (II) अंतर्गत काही प्रकरणांमध्ये घटस्फोटाचा अधिकार मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. यामध्ये बलात्काराचे प्रकरणही समोर आले आहे. एखाद्या महिलेचा पती बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळल्यास ती घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकते. दरम्यान निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात ज्या चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यात बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील नवीननगर ब्लॉकच्या लेहंग-कर्मा गावचा अक्षय ठाकूर याचा समावेश आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे विनय शर्मा , अक्षयसिंग ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेश या सर्व दोषींना २० मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. त्यापूर्वीच निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यासाठी दोषींच्या वकिलाने आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दार ठोठावले आहे. या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणी व्हावी यासाठी दोषीच्या वकिलाकडून प्रयत्न केला जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!