Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : देशातील तिसरा मृत्यू मुंबईत , एकूण रुग्णांची संख्या १४ तर देशात १२५ जणांना लागण

Spread the love

देशभरात १२५ जणांना करोनाची लागण झाली आहे. अगोदर कर्नाटक, नंतर दिल्ली आणि महाराष्ट्रात करोनाने तिसरा बळी घेतला आहे. मुंबईत करोनावर उपचार घेत असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. करोनासह या व्यक्तीवर विविध उपचार सुरू होते. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात या व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला. यापूर्वीही करोनाने दोन बळी घेतले होते. हा आकडा आता एकूण तीनवर पोहोचला आहे.  दरम्यान, या मृत्यू झालेल्या व्यक्तीविषयी जास्त माहिती समोर आलेली नाही. देशात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबईतही अनेक रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. मात्र आतापर्यंत राज्यात एकही मृत्यू झाला नव्हता. करोनामुळे मृत्यू होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना ठरली. महामुंबईतील एकूण करोना रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईचे सहा तर मुंबईबाहेरच्या आठ रुग्णांचा समावेश आहे.

राज्यभरात करोनाची भीती वाढत असतानाच शनिवारी कोरोनाची लागण झालेल्या कल्याणमधील एका रुग्णाची पत्नी (३७) आणि तिच्या तीन वर्षीय मुलीलाही या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तसेच भांडुपमधील एक आणि नवी मुंबईतील दोन रुग्णांनाही करोनाची लागण झाल्याचे निदान सोमवारी झाले. कस्तुरबा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये आत्तापर्यंत १८६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ४३३ संशयितांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. तर कस्तुरबात एकूण ६५ रुग्णांवर जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. शाह यांनी दिली. दरम्यान ज्या रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयात दाखल न होता खासगी रुग्णालयात दाखल व्हायचे आहे, त्यांना तशी मुभा देण्यात आली आहे.

करोनाच्या लक्षणांवरून पालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून रुग्णांची विभागणी करण्यासाठी ‘रिस्क प्रोफाईल कमिटी’ची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये तीव्र लक्षणे असलेल्या ‘अ’ श्रेणीतील रुणांवर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ‘ब’ श्रेणीतील सौम्य लक्षणे दिसलेल्या रुग्णांना अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. करोनाची लागण झालेल्या देशांतून प्रवास करून आलेल्या आणि अत्यंत सौम्य लक्षणे दिसलेल्या संशयितांना घरी पाठवण्यात येत असून त्यांच्यावरदेखील देखरेख ठेवण्याचे काम पालिकेच्या डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.पालिकेच्या अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात ३०० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी २४ डॉक्टर आणि आवश्यक कर्मचारी तैनात करण्यात आल्याची पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी आठ डॉक्टर २४ तास ड्युटीवर आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयात सध्या ११ संशयितांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

मुंबईतील सहा आणि मुंबईबाहेरील आठ जण करोना ‘पॉझिटिव्ह’ आढळले आहेत. यामध्ये रविवारी तपासणी झालेल्या संशयितांचे हवाल सोमवारी आले असून भांडुपमधील एक, कल्याणचे दोन आणि नवी मुंबईतील दोन संशयितांच्या चाचण्या ‘पॉझेटिव्ह’ आल्या आहेत. नवी मुंबईतील दोन रुग्ण ४२ आणि ४७ वर्षीय असून हे रुग्ण १४ मार्च रोजी निदान झालेल्या रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आले होते. भांडुपचा रुग्ण पोर्तुगाल येथून १३ मार्च रोजी मुंबईत आला होता. सोमवारी सायंकाळी ६.३० पर्यंत आलेल्या करोना संशयितांच्या २० पैकी २० चाचण्या निगेटिव्ह’ आल्या असून २४ जणांच्या चाचण्यांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!