Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ.जयश्री सूर्यवंशी, साठ वर्षात पहिल्यांदाच पूर्णवेळ महिला कुलसचिव

Spread the love

परीक्षा मंडळ, उस्मानाबाद उपपरिसर संचालकांचीही नियुक्ती । अधिष्ठातांसह विविध नियुक्त्या जाहीर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ.जयश्री राजेश सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी विविध संवैधानिक अधिका-यांच्या नियुक्तीची घोषणा मंगळवारी केली.

‘कोरोना‘ सदंर्भात विविध उपाययोजना करण्यात आल्या असून या संदर्भात मा.कुलगुरु यांनी मंगळवारी (दि.१७) आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले, विद्यापीठातील विविध संवैधानिक अधिकारी पदांसाठी ७, १३ व १४ मार्च रोजी विविध विविध पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. विद्यापीठ प्रशासनाने सदर प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरितीने पार पाडली. आस्थापना विभागाचे उपकुलसचिव दिलीप भरड व सहका-यांनी यासाठी प्रयत्न केले. विविध पदांसाठी आलेले अर्ज, उपस्थित उमेदवार व निवडलेले प्राध्यापक, अधिकारी पुढील प्रमाणे आहेत.

अधिष्ठाता – विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा (अर्ज : १६, उपस्थित -१ ) डॉ.भालचंद बाबुराव वायकर, मानव्यविद्या व सामाजिकशास्त्र (अर्ज १३, उपस्थित – ११) डॉ.प्रशांत शामराव अमृतकर, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखा (अर्ज -०५, उपस्थित -०५) डॉ.वाल्मिक कचरु सरवदे तर आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठातापदी डॉ.चेतना प्रल्हाद सोनकांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ वायकर व डॉ सरवदे यांनी यापूर्वी अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेवर काम केले आहे. तर डॉ सोनकांबळे व डॉ अमृतकर हे पहिल्यांदाच अधिष्ठातापदी विराजमान होणार आहेत. याशिवाय परीक्षा मंडळ संचालकपदी डॉ.योगेश नारायण पाटील (लोणेरे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उस्मानाबाद उपपरिसर संचालकपदी डॉ.दत्तात्रय कृष्णा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते शिवाजी विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागात कार्यरत आहेत. या पदासाठी अनुक्रमे १७ व १२ जणांनी मुलाखती दिल्या होत्या. डॉ पाटील यांनी लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक म्हणून कार्य केले आहे.

पहिल्या पूर्णवेळ महिला कुलसचिव

विद्यापीठाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पुर्णवेळ महिला कुलसचिवपदी महिला प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.जयश्री राजेश सूर्यवंशी या वाणिज्यशास्त्र विभागप्रमुखपदी कार्यरत असून परीक्षा मंडळ संचालकपदीही त्यांनी काम पाहिले आहे. डॉ धनराज माने यांनी ५ जानेवारी २०१५ रोजी उच्च शिक्षण संचालकपदी नियुक्ती झाल्यापासून या पदावर प्रभारी व्यक्ती कार्यरत होत्या. १० नोव्हेंबर २०१७ पासून डॉ.साधना पांडे या प्रभारी कुलसचिवपदी कार्यरत आहेत. दरम्यान, डॉ जयश्री सूर्यवंशी या धरणाधिकारपदाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ कुलसचिव पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. नवनियुक्त सर्व संवैधानिक अधिकाऱ्यांचे कुलगुरू डॉ . प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉ प्रवीण वक्ते यांनी अभिनंदन केले आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!