Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus Update : चीनमधून दिलासादायक बातमी , ३१०० हुन अधिक बळी गेल्यानंतर कोरोना आटोक्यात आल्याची माहिती ,

Spread the love

जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने कोव्हिड १९’ हा जागतिक साथरोग (पॅन्डेमिक) असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर चीनने आज एक दिलासादायक बातमी दिली आहे. करोनाचा संसर्ग चीनमध्ये कमी होत असून जोर ओसरला असल्याची माहिती समोर आली आहे. करोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिली. जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा संसर्ग वुहान शहरात पहिल्यांदा झाला. त्यानंतर चीनमधील ३१ प्रातांत करोनाचा संसर्ग झाला. चीनमध्ये करोनामुळे ३१०० हून अधिकजणांचा मृत्यू झाला. तर, ८० हजारहून अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चीनमध्ये करोनावर पूर्णत: नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चीनमध्येच करोनाचा संसर्ग आहे असे वाटत असतानाच त्याने इतर देशातही फैलावण्यास सुरुवात केली. दक्षिण कोरिया, इराण, इटली, अमेरिकेतही करोनाचा संसर्ग फैलावला आहे. इटली व इराणला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर, दुसरीकडे चीनमध्ये करोनाचा जोर ओसरला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या मागील दिवसांमध्ये घटली आहे. मृतांच्या संख्येतही घट झाली असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

चीनमध्ये करोना व्हायरसचे मुख्य केंद्र असलेल्या वुहान शहरात परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून करण्यात येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव शी जिनपिंग यांनी मंगळवारी वुहानचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची भेट आभार मानले. वुहानमधील करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला होता. त्यानंतर वुहानमध्ये काही कंपन्याचे कामकाज सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. चीनमधील ही परिस्थिती दिलासादायक असून करोनाचा जोर ओसरला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!