Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus Update : आई ,बाबा बरोबर तीन वर्षाच्या चिमुरडीलाही कोरोना, राज्यातील संख्या ३९ च्या घरात….

Spread the love

मुबई , पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे आढळून येत आहे दरम्यान आज रात्रीपर्यंत हा एकदा एक ने वाढून ३९ झाला आहे . मुंबईत आधी वडील , मग आई आणि आता त्यांच्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलीची कोरोना व्हायरसची टेस्टही पॉझिटिव्ह आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे . दरम्यान या तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे .  मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये या कुटुंबाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीच्या वडिलांना सर्वप्रथम कोरोनाची बाधा झाली होती. वडिलांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर  तिच्या ३३ वर्षांच्या आईलाही आणि आता या ३ वर्षांची मुलीलाही कोरोनाची बाधा झाली. आज दोघींचे  रिपोर्ट आले असता यात दोघींनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं, असल्याची माहिती कस्तुरबा रुग्णालयामधील डॉक्टरांनी जाहीर केलं. त्यामुळे राज्यात सर्वात कमी वयाच्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे, या चिमुरडीची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३९ वर गेली आहे. मुंबईतला कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखीन ५ रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती आहे. मुंबई आणि नवी मुंबईत नवीन ही नवीन रुग्णांची भर पडली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

बारामतीमध्ये दोन भावांना कोरोनाची बाधा झाल्याचा संशय 

याशिवाय  बारामतीमध्ये एकाच कुटुंबातील दोन जणांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या दोन्ही संशयित भावांना पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बारामती शहराच्या हद्दीत राहणाऱ्या या कुटुंबातील लहान भाऊ हा पिंपरी चिंचवडमध्ये नोकरीला आहे. अचानक काही दिवसांपूर्वी त्याला सर्दी, खोकला आणि घश्यात दुखू लागले होते. याची माहिती मिळताच मोठा भाऊ पिंपरीमध्ये जाऊन लहान भावाला घरी सोबत घेऊन आला. परंतु, काही दिवसांनी मोठ्या भावालाही सर्दी, खोकला होऊन ताप  आला आणि त्याचाही घसा दुखायला लागला. त्यामुळे दोन्ही भावांना  आज  शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर या दोघांना दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. दोन्ही भावांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे का? याची तपासणी सुरू आहे. दोन्ही भावांना सध्या संशयित रुग्ण म्हणून उपचार सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!