Corona Virus Effect : जिल्हाधिका-यांचा बंदी आदेश झुगारून शिर्डीत “साई परिक्रमा” , आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू असताना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शिर्डीतील साई परिक्रमेला बंदी घातलेली असताना शिर्डीत रविवारी पहाटे साई परिक्रमा उपक्रम झाला. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी परिक्रमाच्या आयोजकांवर शिर्डी पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बंदी आदेश झुगारून काढण्यात आलेल्या या परिक्रमा महोत्सवाचे आयोजक डॉ. जितेंद्र शेळके, अजित संपतलाल पारख व महोत्सव समिती सदस्यांविरोधात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी , शिर्डीचे प्रातंधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Advertisements

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कार्यक्रम स्थगित करण्यासंबंधी शनिवारी प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये कार्यक्रम स्थगित करण्याचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिला होता. यासंबंधीची लेखी अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली होती. तरीही  रविवारी पहाटे ही परिक्रमा करण्यात आली. शिर्डीची सीमा असलेल्या सुमारे १४ किलोमीटर मार्गावरून ही परिक्रमा नेण्यात आली. यामध्ये सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, नगराध्यक्षा अर्चना कोते, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, कमलाकर कोते, सचिन तांबे, विजय कोते यांच्यासह नगरसेवक, शिर्डी साईबाबा संस्थानचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सर्व पक्षीय कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला, दिल्लीसह अन्य ठिकाणांहून आलेले भाविक सहभागी झाले होते. परंतु प्रशासनला माहिती देताना परिक्रम रद्द झाल्याची खोटी माहिती आयोजकांनी देऊन परिक्रमा काढलीच होती. त्यामुळे प्रशासनाचा आदेश व सूचनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आयोजिकांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार