Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भीमा कोरेगाव प्रकरण : डॉ. आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जमीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

Spread the love

बहुचर्चित भीमा कोरेगाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने  सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. न्यायालयाने नवलखा आणि तेलतुंबडे यांना आत्मसमर्पणासाठी तीन आठवड्यांचा  वेळ दिला आहे. सोबतच,  त्यांना आपला पासपोर्टही जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि एम आर शाह यांच्या खंडपीटानं दोन्ही कार्यकर्त्यांना तीन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने  ६ मार्च रोजी दोन्ही कार्यकर्त्यांना अटकेपासून प्रदान केलेल्या सुरक्षेचा कालावधी वाढवला होता. तेलतुंबडे आणि नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्यांची ही याचिका सुरुवातील पुणे सत्र न्यायालयाने  फेटाळून लावली होती. १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यात घडवून आणल्या गेलेल्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात नवलखा, तेलतुंबडे आणि इतर अन्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कथित माओवाद्यांशी संबंध आणि इतर कारणांवरून अटक केली होती. आरोपींनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!