Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus Effect : कोरोना व्हायरसच्या गाण्यांचा युट्युब वर धिंगाणा, उत्कर्ष शिंदे यांच्या दोन गाण्यासह सह आली डझनाहून अधिक गाणी…

Spread the love

सध्या देशभरात कोरोनामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अनेक जण आपापल्या परीने लोकांमध्ये कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करीत आहेत . महानायक अमिताभ बच्चन यांनीही एका छोट्या व्हिडीओद्वारे देशवासियांना कोरोनाविषयी काय काळजी घ्यावी हे आपल्या युपीच्या खास ढंगात सांगितले . दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा “गो करोना… गो कोरोना ” हा व्हिडीओ चांगलाच गाजला होता. रामदास आठवले यांच्या ” गो कोरोना गो ..” या लोकप्रिय शब्दांचा वापर करून “शिंदेशाही एक लोकप्रिय शिलेदार डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी गो-करोना, करोना गो हे गीत लोकांसमोर आणले आहे. हे गीत आज शनिवारी संध्याकाळी प्रदर्शित करण्यात आले आहे. तेजस चव्हाण यांनी हे गीत संगीतबद्ध केलं असून त्यांनीच याचे बोल लिहिले आहेत. करोनामुळे नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. ते या गीतामधून दूर करण्याचा प्रयत्न केला असून काळजी कशी घ्यायची ते हसत खेळत सांगण्यात आले आहे.

Rezonance Studio ने हे गीत युट्युबवर टाकले असून गीत ऐकणारी संख्या वाढत आहे. या शिवाय डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी कोरोना व्हायरसचा विषय घेऊन “तुझ्या बापाला कोरोना व्हायरस म्हणतात गल्लीतली पोर ” हे विनोदी गीतही आपल्या युट्युब चॅनलवर टाकले असून लोकांनी कोरोना व्हायरसच्या भीतीने पॅनिक होऊ नये असे वाटल्याने आपण हे गीत सादर केले असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान कोरोनावर अनेक  व्हिडीओ , विनोद , कविता सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. मात्र हे सगळे तयार करताना आणि आलेले मॅसेज फॉरवर्ड करताना काळजी घेण्याची गरज आहे. करोना विषाणूबद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर केले पाहिजेत या जाणिवेतून तेजस चव्हाण आणि डॉ . उत्कर्ष शिंदे रामदास आठवले यांचे “गो करोना, करोना गो..”  हे शब्द घेऊन अत्यंत सोप्या भाषेचा वापर करत हे गाणं सादर करण्यात आलं आहे. करोनाबद्दल खूप गैरसमज समाजात आहेत. भीती न बाळगता सर्व गोष्टी नीट समजून घ्यायला पाहिजे. काळजी काय घ्यावी हे समजून घ्यावं. या गाण्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून कमावण्याचा काही हेतू नाही. फक्त लोकांमधील भीती दूर व्हावी आणि गैरसमज निघून जावे यासाठी हे गाणं आहे, असं उत्कर्ष शिंदे यांनी म्हटलं आहे. उत्कर्ष शिंदे हे स्वत: डॉक्टर आहेत. अनेक रुग्णांमध्ये त्यांनी करोनाची दहशत पाहिली आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि याविषयी सर्व माहिती नीट समजून घ्या, असा संदेश त्यांनी दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!