Corona Virus Effect : इटलीत कोरोनाला रोखण्यासाठी जालीम उपाय, उपचाराला नकार दिल्यास २१ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा…

Advertisements
Advertisements
Spread the love

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून सध्या इटलीत हाहाकार उडाला आहे . दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी इटलीने एखाद्या रुग्णामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणे दिसल्यास, त्या व्यक्तिला १४ दिवस वेगळे राहावे लागते. दरम्यान संशयित रुग्णाने असे करण्यास नकार दिल्यास त्याला २१ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते, असे फर्मान काढण्यात आले आहे. इटलीमधील सरकारी अधिकाऱ्यांनी असा इशारा दिला आहे. कोरोना व्हायरसची लक्षणे जसे की, खोकला, ताप किंवा त्वचेचा आजार असल्यास त्यांनी इतरांशी संपर्क टाळावा, अथवा त्यांना खुनाचा प्रयत्न केल्याची शिक्षा होऊ शकते. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी इटली  सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. या देशात गेल्या २४ तासात कोरोना व्हायरसने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १२६६ झाली आहे.

Advertisements

चीनमधून  सुरू झालेला कोरोना व्हायरस आता संपूर्ण युरोपमध्ये पोहोचला आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये या व्हायरसने धुमाकूळ घातला असून इटलीतील स्थिती तर दिवसेंदिवस खराबच होत चालली आहे. या रोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही इटली मोठ्या प्रमाणात आहे. सध्या इटलीमध्ये मेडिकल आणि रुग्णालय वगळता इतर सर्व देश लॉकडाउन करण्यात आला आहे. नागरिकांना आरोग्य किंवा कामाच्या कारणास्तव प्रवास करण्यास परवानगी नाही आहे. त्यामुळं या आजाराला आळा घालण्यासाठी आणि संसर्ग थांबवण्यासाठी रुग्णांवरच गुन्हा दाखल करण्यास इटली सरकारने सुरुवात केली आहे. दरम्यान भारतातही साथ रोग कायदा लागू झाला असून या कायद्याचे पालन न करणारास सहा महिने ते तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

Advertisements
Advertisements

या शिवाय इटलीत जरी केलेल्या नव्या कायद्यानुसार जर एखाद्या कोरोनाव्हायरस ग्रस्त व्यक्तीने दुसऱ्या वृद्ध व्यक्तीला असुरक्षित केल असेल किंवा या व्यक्तिमुळे त्याला कोरोनाची लागण झाल्यास ‘हेतुपूर्वक खून’ केल्याचा आरोप केला जाऊ शकतो आणि २१ वर्षांपर्यंत तुरुंगात घालवू शकतो, असा इल सोलेचा अहवाल आहे. दरम्यान, ब्राझील, कॅनडा आणि अमेरिका असे अनेक देशांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी स्वत:ला घरातच कोंडून घेतलं आहे. याबाबत त्यांच्या कार्यालयातून माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या पत्नीला कोरोना व्हयर्सची लक्षणे आढळून आली होती.

आपलं सरकार