Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हर्षवर्धन जाधव अॅट्राॅसिटी प्रकरण : उपयुक्त म्हणतात आरोपी हायप्रोफाईल असला तरी नियमानुसार कारवाई , तपासी अधिकाऱ्याची मात्र माहिती देण्यास टाळाटाळ !!

Spread the love

आरोपीवरील कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ,एसीपी गुणाजी सावंत म्हणतात मी माध्यमांना बोलण्यास बांधिल नाही…

औरंगाबाद – महाराष्र्ट नवनिर्माण सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर नियमानुसारंच कारवाई करण्यात येईल असे आदेश आपण तपासअधिकार्‍याला दिले आहेत. आरोपी हायप्रोफाईल असला म्हणून पोलिस कारवाई करतांना कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत. अशी माहिती पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी दिली.
हर्षवर्धन जाधव यांच्यावर काही दिवसांपूर्वी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जाधव यांच्या अदालतरोडवरील जागेवर रमेश रतन दाभाडे यांनी पान टपरी लावून व्यवसाय सुरु केला होता.ही बाब जाधव यांना कळल्यावर त्यांनी दाभाडे जाब विचारला.म्हणून दाभाडे यांच्या तक्रारीवरुन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान जाधव यांनी अटकपूर्वजामिनासाठी न्यायालयात अर्ज केल्यानंतर तो फेटाळला त्यामुळे जाधव यांना या प्रकरणात अटक टाळता येणार नाही , अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिल्यानंतर जाधव यांच्या विरोधात अटक करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पुराव्यावरुन पुढील कारवाई करण्यात येईल. आरोपी हायप्रोफाईल असला म्हणून पोलिस कारवाई करतांना कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत, असे उपायुक्त खाटमोडे म्हणाले.

आरोपीवर कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ,एसीपी गुणाजी सावंत चे प्रताप 

दरम्यान  अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर आरोपीवर कारवाई करणार का ? या बाबत माध्यमांना माहिती देण्याची टाळाटाळ तपास अधिकारी गुणाजी सावंत यांनी केली. गेल्या तीन आठवड्यांपूर्वी महाराष्र्ट नवनिर्माण सेनेचे ग्रामिण चे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी जाधवांना तपासअधिकारी गुणाजी सावंत याने पोलिस ठाण्यात सन्मानाने बोलावून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करा बाकीचे माझ्यावर सोपवा असा सल्ला दिल्याचे क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले. त्यानुसार आरोपी जाधव यांनी अटक पूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला पण न्यायालयाने तो फेटाळला. यामुळे मनस्ताप झालेल्या गुणाजी सावंत यांनी  माध्यमांचे फोन उचलणे बंद केले. ही बाब वरिष्ठांच्या निर्दशनास आल्यावर त्यांची समजूत वरिष्ठांनी काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.दरम्यान आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना एसीपी सावंत यांनी मुक्ताफळे उधळली. मी माध्यमांना बोलण्यास बांधिल नाही. माझ्या नंबरवर फोन करु नका सी.पी.शी बोला असा मोलाचा सल्ला दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!