Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus : कोरोनामुळे देशात दुसरा मृत्यू , रुग्णांची संख्या ८१ वर

Spread the love

देशात बहुचर्चित कोरोना व्हायरसने दुसरा बळी घेतला आहे. कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला झाल्यानंतर  आता दिल्लीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ६९ वर्षाच्या या महिलेवर दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. करोनाच्या रुग्णांवर दिल्लीत राम मनोहर लोहिया हॉस्पिटल आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

या महिलेला तिच्या मुलामुळे करोनाचा संसर्ग झाला होता. तिचा मुलगा जपान, जिनेव्हा आणि इटलीचा दौरा करून दिल्लीत घरी परतला होता. तपासणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तो ४६ वर्षांचा आहे. त्याच्या कुटुंबातील सर्वांची करोनाची तपासणी करण्यात आली. पण आईला सोडून कुणालाही करोनाची लागण झाली नसल्याचं तपासणीत स्पष्ट झालं. यानंतर मुलावर आणि त्याच्या आईवर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. यात आईचा करोनामुळे मृत्यू झाला. भारतात करोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे.

दरम्यान, केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात करोनाच्या तपासणीसाठी दाखल झालेले दोन विदेशी पर्यटक पळून गेले असल्याचे वृत्त आहे. त्यांना सर्दी आणि ताप होता. कोरोनाची चाचणी करण्यासाठी त्यांना दाखल केले  होते. दोघांचे  वय २० ते २२ वर्ष होते , अशी माहिती पोलिसांनी दिलीय. देशात ८१ जणांना करोनाची लागण झाली आहे. केरळमधील तिघांना आणि दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमधील ७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. करोनाची लागण झालेल्या ८१ जणांमध्ये ६४ भारतीय आहेत. तर १६ जण इटलीचे आणि १ कॅनडाचा नागरिक आहे.

केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय 

देशातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने मास्क आणि सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला आहे. यामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न आहे. ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे.

दरम्यान मुंबईत गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझर पुरवण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यानंतर केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला आहे. यात सर्जिकल मास्क, एन ९५ मास्कचा समावेश असेल. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्पुरता हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारने म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात ८१ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. केरळमधील तिघांना आणि दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमधील ७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय. करोनाची लागण झालेल्या ८१ जणांमध्ये ६४ भारतीय आहेत. तर १६ जण इटलीचे आणि १ कॅनडाचा नागरिक आहे. तसंच करोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेले आणि संशयितांची संख्या ४००० वर गेली आहे. त्यांच्यावरही डॉक्टरांकडून देखरेख ठेवण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव अग्रवाल यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!