Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : सहकारी पोलिसांच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाने केला आत्महत्येचा प्रयत्न

Spread the love

औरंगाबाद – पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातून बदली झालेल्या महिला पोलिस कर्मचार्‍यावर एपीआय घन्नशाम सोनवणे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिला कर्मचार्‍याच्या विरोधात २०१९ पासून वरिष्ठांकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तर पिडीत महिला पोलिस कर्मचार्‍याच्या म्हणण्या नुसार तिचा पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातील काही कर्मचार्‍यांनी छळ केला. याबाबत तिने अनेकवेळा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या परंतु त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी तिचीच इतरत्र बदली करण्यात आली. यामुळे चिडून पिडीतेने सहा महिन्यापूर्वी एका पोलिस कर्मचार्‍याच्या कानशिलात लगावली होती.

या सर्व प्रकाराला वैतागून पिडीतेची वाळूज पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली होती मात्र बदली झाल्याचे कळताच पिडीतेने पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या व्हाॅटसअॅप ग्रुपवर आत्महत्या करंत असल्याचा धमकीवजा मॅसेज  पाठवला. पीएसआय मीरा चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पिडीतेला खाजगी रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास एपीआय घन्नशाम सोनवणे करंत आहेत. सदर पीडित महिला पोलीस कॉन्स्टेबलने तिला तिच्या सोबतचे पोलीस ठाण्यातील कर्मचारी मानसिक छळ करीत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!