Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपी दोन वर्षानंतर बेगमपुरा पोलिसांच्या जाळ्यात

Spread the love

औरंगाबाद – किरकोळ कारणावरुन चाकूने वार करुन फरार झालेला रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराला बेगमपुरा पोलिसांनी तब्बल दोन वर्षानंतर टाऊनहाॅल परिसरातून अटक केली.
शेख अश्पाक शेख अन्वर(22) रा.जयभिमनगर घाटी असे अटक आरोपीचे नाव आहे. २०एप्रिल २०१८रोजी टाऊनहाॅल परिसरात अतुल वाघमारे या तरुणावर भांडणामुळे अश्पाक ने चाकूचे वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात अश्पाक चे साथीदार सचिन जावळे आणि नितीन भालेरावला अटक करण्यात आली होती.व दोषारोप पत्र दाखल झाले होते.पण अश्पाक फरार होता. अश्पाकवर सिटीचौक, छावणी आणि बेगमपुरा पोलिस ठाण्यात विविधप्रकारचे ७गुन्हे दाखल आहेत.गेले दोनवर्ष तो तेलंगणा परिसरात राहात असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे.शुक्रवारी अश्पाक घरी आल्याची माहिती बेगमपुरा पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रमोद देवकाते, नंदकुमार शिब्रे, पोलिस कर्मचारी शरद नजन यांनी अश्पाकला ताब्यात घेत चौकशी केली असता. अश्पाक ने सर्व गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली बेगमपुरा पोलिस करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!