Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चालकाला पार्किंगमध्ये थांबवून महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केली आत्महत्या !!

Spread the love

नागपूर येथील महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल (वय ५२) यांनी मालगाडीखाली आत्महत्या केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास शासकीय वाहनाने घुगल रेल्वे स्थानकावर आले. चालकाला त्यांनी माझा मित्र येणार आहे, थोड्या वेळात येतो. तू पार्किंगमध्ये थांब असे सांगून ते निघून गेले. त्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर मुंबईच्या बाजूने असलेल्या रल्वे मार्गावर ते चालत गेले आणि पार्सल ऑफिसच्या थोडे पुढे त्यांनी धावत्या मालगाडीखाली उडी घेतली. त्यांनी आत्महत्या का केली ? याचे करणं मात्र समजू शकले नाही.

नागपूर लोहमार्ग पोलीस तसेच आरपीएफने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली तेंव्हा पोलिसांना त्यांच्या खिशात पैसे, ओळखपत्र, मोबाइल आदी साहित्य सापडले. त्या आधारेच लोहमार्ग पोलिसांनी महावितरणच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला व या घटनेबाबत कळविले. दरम्यान त्यांच्या चालकाला याबाबत काहीच कल्पना नव्हती. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या चालकाशी संपर्क साधला असता, आपण रेल्वे स्थानकावर साहेबांची वाट पाहात असल्याचे सांगितले. त्यानंतरच पोलिसांना बाहेर चालक उभा असल्याची माहिती मिळाली. घुगल हे काटोल मार्गावरील महावितरणच्या कॉलनीत राहात होते. शुक्रवारी सकाळीही १० च्या सुमारास ते रेल्वे स्थानकावर आले होते, अशी माहिती आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!