Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus Effect : कर्नाटकात भारतातील पहिला बळी, देशभरात ७६ जणांना लागण

Spread the love

भारतात शिरकाव झालेल्या कोरोना व्हायरसने  कर्नाटकात  पहिला बळी घेतला असल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार कलबुर्गी येथील एका ७६ वर्षीय रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी ही माहिती दिली. मोहम्मद हुसेन सिद्दीकी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. सिद्दीकी यांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. कलबुर्गीतील करोनाच्या रुग्णाच्या मृत्यूला अजून केंद्रीय आरोग्य विभागाने दुजोरा दिलेला नाही. पण कर्नाटकच्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी रुग्णाला करोना झाला होता असे स्पष्ट केले आहे. यानंतर कर्नाटकच्या आरोग्य विभागाने आता रुग्णाच्या संपर्कात येणार नागरिकांचा तपास सुरू केला आहे. तेलंगण सरकारलाही याची माहिती देण्यात आली आहे. सिद्दीकी यांना करोनाची लागण झाली होती. तेलंगणमधील एका रुग्णालयात उपचारसाठी ते दाखल झाले होते.

दरम्यान देशातील ७ राज्यांमध्ये करोनाचे १६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे करोनाच्या रुग्णांची संख्या ७६ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, लडाख, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात करोनाचे नवे रुग्ण आढळन आले आहेत. करोनाने आतापर्यंत जगभरात ४६०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १, २५, २९३ जणांना करोनाची लागण झाली आहे. भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी आणखी खबरदारीचं पावलं उचलली आहेत. दिल्ली सरकारने ३१ मार्चपर्यंत सर्व शाळा, कॉलेजेस, चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!