Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोरोना व्हायरसच्या फेक न्यूज आणि फेक अॅप्सच्या विरोधात गुगल आणि अॅपलची विशेष मोहीम…

Spread the love

कोरोना व्हायरसमुळे जगभरातभीतीचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियावर करोना संदर्भात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. करोना संदर्भातील फेक न्यूजला आळा घालण्यासाठी गुगल आणि अॅपल एकत्र आले असून त्यांनी याविरोधात मोहीम उघडली आहे. अॅपल-गुगलप्रमाणेच सोशल मीडियातील दिग्गज कंपनी ट्विटर आणि फेसबुकनेही या दोन कंपन्यांना पाठिेंबा दिला आहे. करोना संदर्भात सध्या सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या फेक न्यूज विरोधात अॅपल आणि गुगलने पावले उचलली आहेत. अॅपलने करोना व्हायरस संदर्भातील सर्व मोबाइल सॉफ्टवेअर्स तसेच अॅप्स हटवले आहेत. त्यांच्या प्लेटफॉर्मवर जे काही होते अशा अॅप्सना तसेच सरकारने आणि आरोग्य विभागाने परवानगी नाकारलेल्या सर्व अॅप्सना हटवण्यात आले आहे. अँड्रॉयड युजर्स करोना व्हायरसच्या माहिती जाणून घेण्यासाठी काही बनावट अॅप्सचा उपयोग करीत असल्याचे निर्दशनात आले आहे. डेव्हलेपर्स कडून प्ले स्टोरवर असलेले फेक अॅप्स गुगलने तत्काळ हटवले आहे. करोना व्हायरसची चुकीची माहिती पसरवणाऱ्या फेक अॅप्सला गुगलने प्ले स्टोरमधून हटवले आहे. गुगल आणि अॅपलच्या या निर्णयामुळे फेक न्यूजला नक्कीच आळा बसण्यास मदत होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!