Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बिहारमधून कोरोनाचा संशयित रुग्ण जेंव्हा बेपत्ता होतो…

Spread the love

बिहारमध्ये करोनाचा एक संशयित रुग्ण गायब  झाल्यामुळे शासकीय यंत्रणेची एकच धावपळ उडाली. बिहारच्या बिहार शरीफ स्थित सदर रुग्णालयात एका व्यक्तीने  आपल्यामध्ये करोनाची लक्षणे  आढळत असल्याचे  सांगत गोंधळ घातला. त्यानंतर डॉक्टरांनी योग्य उपचारांसाठी या व्यक्तीला दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मात्र हा संशयित रुग्ण अचानक बेपत्ता झाला. नालंदा जिल्ह्याच्या बिंड पोलीस स्टेशन अंतर्गत नौरंगाचा रहिवासी असलेल्या गौतम कुमार रुग्णालयात पोहचला होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तीनं आपणं दिल्लीत काम करत असल्याचं सांगितलं. ४ मार्च रोजी तो बिहारमध्ये आपल्या घरी परतला होता, अशी माहिती नालंदाचे सिव्हिल सर्जन राम सिंह यांनी दिली.

सदर व्यक्ती दिल्लीहून परतल्यानंतर त्याच्यात करोना व्हायरसची लक्षणं दिसून येत होती. ताप येणं, कोरडा घसा आणि घशात जळजळ अशा तक्रारीही त्याने  केल्या होत्या.  डॉक्टरांनी त्याला  रक्त तपासणीसाठी रुग्णालयात दाखल भरती करून घेत आयसोलेशन वॉर्डमध्ये थांबण्याचा सल्ला देण्यात आला. तेव्हा त्याने  आपण गुरुवारी परत येतो, असे सांगत त्याने इथून काढता पाय घेतला. कुटुंबीयांच्या दबावानंतर गौतम बुधवारी सायंकाळी परत सदर रुग्णालयात आला. यावेळी डॉक्टरांनी त्याला वर्धमान इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसला (VIMS) भेट देण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे, वर्धमान इन्स्टिट्युटचे डेप्युटी सुपरिटेन्डंट डॉ. बीबी सिन्हा यांच्या दाव्यानुसार, सायंकाळी ६.१५ पर्यंत कोणताही रुग्ण इथे दाखल झाला नाही. त्यानंतर त्याला शोधण्यासाठी शासकीय यंत्रणेची खळबळ उडाली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!