Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मध्य प्रदेशातील राजकीय उलथापालथ : कमलनाथ यांचा आपलं सरकार स्थिर असल्याचा दावा !!

Spread the love

काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींना वेग आला असून फुटीर आमदार आणि मंत्र्यांमुळे कमलनाथ सरकार कोसळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत असली तरी तरी कुठलीही चिंता करण्याचं कारणा नाही. आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करू. आपलं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास कमलनाथ यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत व्यक्त केला.  २२ आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे दिल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी तातडीने काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. दरम्यान  आमच्याकडे अजूनही बहुमत आहे, असा दावा करून कमलनाथ सरकारला कुठलाही धोका नसल्याची प्रतिक्रिया  काँग्रेस नेते पी.सी. शर्मा आणि शोभा ओझा यांनी या बैठकीनंतर दिली.

एकीकडे कमलनाथ यांचे सरकार अस्थिर झाले असले  तरी दुसरीकडे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मास्टर स्ट्रोक अजून बाकी आहे, असा दावा काँग्रेसने केलाय. पण हा मास्टर स्ट्रोक काय आहे? हे मात्र काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. दरम्यान राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या ३० वर गेली आहे, असं भाजपने म्हटलं असून . काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यामुळे कमलनाथ सरकार बहुमताचा आकडा कसा गाठणार ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. हा प्रश्न मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते पी.सी. शर्मा यांना करण्यात आला. ‘नक्कीच यातून एक नवीन गोष्ट समोर येणार आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मास्टर स्ट्रोक तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल’, असं उत्तर शर्मा यांनी दिलं. बेंगळुरूमधून १९ आमदारांचे राजीनामे सोबत आणले आहेत. ही संख्या वाढून ३० पर्यंत जाऊ शकते. अनेक काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे, असं भाजपचे नेते भूपेंद्र सिंह यांनी सांगितलं.

काय असेल कमलनाथ यांचा मास्टर स्ट्रोक?

अशी चर्चा आहे कि , कमलनाथ यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले असून यानंतर नाराज आमदारांना मंत्रीपद देऊन कमलनाथ त्यांना काँग्रेसमध्ये आणतील. कमलनाथ हे आपल्या निकटवर्तीय नेत्यांच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. यानुसार नाराज बंडखोर आमदारांचं मन वळवण्यासाठी कमलनाथ यांच्या योजना आखली जात आहे. कमलनाथ हे नाराज आमदारांना परत आणण्याच्या प्रयत्नात आहेत. कर्नाटक असलेल्या नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी कमलनाथ हे सज्जन सिंह वर्मा, गोविंद सिंह यांच्यासह आणखी एका जणाला बेंगळुरूला पाठवत आहेत. तिसरी व्यक्ती राजकारणातील नाहीए. हे तीन जण नाराज आमदारांचे मन वळवणार आहेत. दरम्यान, काँग्रेस आमदारांना फसवून त्यांचे राजीनामे घेतले गेल्याचा आरोप, पक्षाचे नेते पी.सी. शर्मा यांनी केलाय.

राज्यसभेची उमेदवारीसाठी ज्योतिरादित्य शिंदेंना पाठिंबा  देण्याच्या नावाखाली आमदारांना फसवण्यात आलं. राजीनामा पत्रावर आमदारांची सही घेतली गेली, असं काँग्रेसच्या शोभा ओझा म्हणाल्या.  कमलनाथ सरकार सुरक्षित आहे. बहुमतावेळी काँग्रेस आमदार कमलनाथ सरकारलाच मत देतील. कमलनाथ यांनी बोलावलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला ९४ आमदार उपस्थित होते, अशी माहिती काही आमदारांनी दिली. आमदारांनी निर्भिड रहावं आणि एकजुटीने मतदान करावं, असं आवाहन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केल्याचं ओझा म्हणाल्या. काँग्रेस आमदारांनास कुठेही एकत्र नेलं जाणार नाही. कुठलाही आमदार स्वतःहून विधानसभा अध्यक्षांकडे राजीनाम देत नाही तोपर्यंत तो ग्राह्य धरला जणार नाही, असं कमलनाथ यांनी बैठकीत आमदारांना स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!