Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus : राज्यातील १० कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर , खबरदारी घ्या पण घाबरून जाऊ नका : मुख्यमंत्री

Spread the love

विधिमंडळाचे अधिवेशन शनिवारपर्यंत चालविण्याचा विचार…

राज्यात पुण्यात करोनाचे ८ आणि मुंबईत दोन असे  एकूण दहा रुग्ण आढळले असून  या दहाही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शिवाय त्यांच्या संपर्कातील सर्व लोकांचीही तपासणी करण्यात आली आहे. करोनाची लक्षणे  १४ दिवस दिसत असल्याने पुढचे १४ दिवस आपल्याला काळजी घेतली पाहिजे. मात्र, करोनामुळे घाबरून जाण्याचे  कारण नाही, असे  सांगतानाच कुणाशीही हात मिळवू नका, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

राज्यातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि , दुबईतील दाम्पत्यासोबत आलेल्या लोकांसोबतच्या ४० पैकी ३० लोकांचा शोध गेतला आहे. हे सर्व बाधित नाहीत. त्यापैकी तिघे कर्नाटकचे असून ४ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. परदेशातून आल्यावर १४ दिवस घरीच राहण्याची गरज असून  वर्ल्ड टूरचं आयोजन करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधण्यात येतअसल्याचे सांगताना त्यांनी सध्या असे टूर्स टाळावेत असे आवाहन  केले.

दरम्यान राज्यात करोनाचा प्रार्दूर्भाव नसल्यामुळे  शाळा, महाविद्यालयांना तुर्त सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. मोठे सभा-समारंभ टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, मास्क लावून फिरण्याची गरज नाही. फक्त हात स्वच्छ ठेवा. कुणाशी हात मिळवू नका, असंही त्यांनी सांगितलं. करोनाचं संकट हातपाय पसरण्याआधीच दूर करण्यासाठी खबरदारी घेण्यात येत असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान येत्या शनिवारपर्यंत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आटोपण्याचा आमचा विचार आहे. त्याचा निर्णय विधिमंडळ घेईल. करोनाला घाबरून नव्हे तर त्या त्या जिल्ह्याचे, तालुक्याचे अधिकारी त्यांच्या भागात असावेत आणि त्यांना तातडीच्या उपाययोजना करता याव्यात म्हणून हा निर्णय घेण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. सध्या विधी मंडळाचे अधिवेशन चालू असल्याने उद्यापासून आमदार, मंत्री आणि अधिकाऱ्यांशिवाय विधिमंडळात कुणालाही प्रवेश देण्यात येणार नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्वांनीच मोठे कार्यक्रम आणि सभा-समारंभ रद्द करावेत, असं आवाहनही त्यांनी केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!