Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus : पुण्यात दोन संशयित आढळल्याने घबराट , देशातील रुग्णांची संख्या ४५ च्या घरात…

Spread the love

दुबईहुन परतलेल्या दोन जणांना कोरोनाच्या संशयावरून  नायडू हॉस्पिटल, पुणे येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहे. तर दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळून आली नसल्याचे सांगण्यात येत असले तरी अंतिम परीक्षण अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे.

वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. मूळ शहरात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकामध्ये  कोरोनाची  लक्षणे आढळलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे  कारण नाही. होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गावोगाव भरणाऱ्या यात्रा व ऊरुसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. होळी सण आपल्या कुटुंबियांसोबतच साजरा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

दरम्यान भारतात कोरोनाव्हायरसचा  धोका वाढला आहे. आता आणखी दोन  राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळून आलेत. कर्नाटक  आणि पंजाबमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या आता ४५ वर पोहोचली आहे. कर्नाटकच्या बंगळुरूत  एका आयटी इंजिनीअरला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. कर्नाटकातील हा पहिला रुग्ण आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!