Corona Virus : पुण्यात आढळलेल्या संशयित कोरोना बाधितांची प्रकृती स्थिर , अफ़वावांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्रात कोरोनाचा एकही नसल्याचा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे करीत नाहीत तोच पुण्यात करोनाबाधीत दोन रुग्ण  आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका खासगी कंपनीच्या माध्यमातून दुबईत फिरण्यासाठी गेलेल्या ४० प्रवाशांमध्ये पुण्यातील तीन तर पिंपरी चिंचवड येथील दोन जणांचा समावेश होता. यापैकी पुण्यातील तिघांमध्ये दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाचा समावेश होता. त्यातील दाम्पत्यावर उपचार करण्यात येत आहेत तर त्यांच्या कार चालकासह मुला-मुलीचेही  रक्ताचे नमुने  घेण्यात आले असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.

Advertisements

पुण्यात कोरोनाचे संशयित  रुग्ण आढळल्यानंतर पुण्यातील पालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने पुणेकरांना विशेष संदेश दिला आहे. पुण्यात आढळलेल्या दोन्ही करोना रुग्णांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन महापौरांनी केले आहे. पुण्यात जे करोनाचे रुग्ण आहेत त्यांच्यात सौम्य प्रमाणात लक्षणे आढळली आहेत. तरीही आपल्याला सर्वांना दक्षता बाळगावी लागणार आहे. कृपा करून कुठल्याही प्रकारच्या अफवांवर तुम्ही विश्वास ठेऊ नका. या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे काळजीचे काहीही कारण नाही. या संपूर्ण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पुणे महापालिका सज्ज आहे. यात कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घेत आहोत, असेही मोहोळ यांनी नमूद केले. येणारे सण सार्वजनिक स्वरूपात साजरे करू नका. गर्दीची ठिकाणे टाळा. पालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यक्षमपणे कार्यरत आहे पण आपणही या सगळ्या प्रसंगात थोडीशी आपली व घरच्यांची काळजी घेतली पाहिजे. आलेल्या संकटाला आपण समर्थपणे सामोरे जाऊया, असे आवाहन मोहोळ यांनी केले.

Advertisements
Advertisements

दरम्यान महापौरांच्या सूचनेनुसार शहरात सध्या सुरू असलेल्या महापौर चषकाच्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. महापालिकेने सणस मैदानावरील एका इमारतीत सोमवारी रात्रीतून २०० खाटा असलेले हॉस्पिटल तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांना सणस मैदानाच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. दरम्यान, महापौर चषक क्रिडा स्पर्धांसाठी राज्यभरातून आलेल्या खेळाडूंना सणस मैदानातील खोल्या रिकाम्या करण्यास सांगितले आहे. अचानक खोल्या सोडाव्या लागत असल्याने खेळाडूंची गैरसोय झाली आहे.

आपलं सरकार