Corona Virus : पुण्यात आणखी दोघांना कोरोना , मुंबईच्या ओला चालकाचाही समावेश

Advertisements
Advertisements
Spread the love

आज दिवसभर पुण्यात लागण झालेल्या रुग्णांची चर्चा चालू असतानाच आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पुण्यातील करोना रुग्णाची संख्या चारवर पोहोचली आहे. यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. तर या तिघांनी ज्या ओला टॅक्सीतून प्रवास केला होता, त्या टॅक्सीचालकालाही करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. हा ओला चालक मुंबईचा राहणारा असल्याने तो मुंबईत ज्यांच्या संपर्कात आला होता, त्या सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे.

Advertisements

दुबईतून पुण्यात आलेल्या एका दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचं कालच उघड झालं होतं. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात आली होती. या दाम्पत्याची मुलगी आणि त्यांनी मुंबई ते पुणे ज्या ओला कंपनीच्या टॅक्सीतून प्रवास केला होता, त्या टॅक्सी चालकाचीही तपासणी करण्यात आली होती. आज या दोघांचे चाचणी अहवाल आले असता त्यात त्यांना करोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे या दोघांना तातडीने नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, हा टॅक्सीचालक मुंबईचा राहणारा आहे. त्यामुळे या दाम्पत्याला मुंबईहून पुण्यात सोडल्यानंतर हा टॅक्सीचालक पुणे आणि मुंबईत ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला त्यांचीही तपासणी होणार आहे. या टॅक्सीचालकाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचीही तपासणी करण्यात येणार असून मुंबईतही करोनाचे आणखी रुग्ण आहेत का? याची तपासणी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Advertisements
Advertisements

दरम्यान, हे दाम्पत्य ज्या ४० लोकांसोबत दुबईला गेले होते, त्यांचीही तपासणी सुरू करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी एकूण पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलिस आणि दोन्ही महानगरपालिकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर पथकाद्वारे वरील दोन्ही रुग्ण ज्या विभागामध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

देशभरात १० नवे रुग्ण 

देशभरात करोनाचे १० नवे रुग्ण आढळून आले आहेत. सुरुवातीला दिल्ली, उत्तर प्रदेश आणि केरळपर्यंत मर्यादित असलेला करोनाचा व्हायरस आता महाराष्ट्र आणि केरळातही दाखल झाला आहे. महाराष्ट्रात करोनाचे काल दोन रुग्ण आढळल्यानंतर आज केरळमध्ये ६ आणि कर्नाटकात ४ रुग्ण आढळलेत. करोनाचे नवीन रुग्ण आढळून आल्याची माहिती केरळच्या मुख्यमंत्र्यांनी दिली. तर कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी करोनाचे ४ रुग्ण आढळल्याचं सांगितलं. यानुसार देशातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ झाली आहे. पण नवीन रुग्णांसंदर्भात केंद्राकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

केरळमध्ये करोनाचे आणखी ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील सातवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसंच त्यांच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या गेल्या आहेत. ८, ९ आणि १०वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील. याशिवाय ट्युशन क्लासेस, आंगणवाडी, मदरसा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं. इटलीहून परतलेल्या एका नागरिकाच्या आई-वडिलांना करोनाची लागण झाली आहे. त्यांना कोट्टायममधील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याचे वय ९० आणि ८५ असे आहे. मंगळवारी ज्या दोघांमध्ये लक्षणं आढळून आली त्यांना करोना झाल्याचं तपासणीतून स्पष्ट झालंय. इटलीहून परतलेल्या एका व्यक्तीला घरी आणण्यासाठी ते दोघे विमानतळावर गेले होते.

दरम्यान राज्यात करोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत. संबंधित रुग्णांच्या कुटुंबीयांनाही वेगळं ठेवण्यात आलंय. त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करावी, असं आवाहन कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी श्रीरामुलु यांनी केलंय.

आपलं सरकार