Corona Rumor : जगभर कोरोनाची भीती , इराण मध्ये अफवेमुळे २७ जणांनी प्राण गमावले….

Advertisements
Advertisements
Spread the love

कोरोनाने जगात सर्वत्र हाहाकार माजवला असून जगातील सुमारे १०० देशांमध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव झाला आहे. कोरोना व्हायरसबाबत अनेक उलटसुलट अफवा पसरवल्या जात असून लोकांमध्ये यामुळे मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे. एकट्या इराणमध्ये पसरलेल्या अफवेतून २७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दरम्यान, करोनाच्या संसर्गामुळे इराणच्या खासदार फतेमह रहबर यांचेही  निधन झाले. त्या ५५ वर्षाच्या होत्या.

Advertisements

उपलब्ध वृत्तानुसार इराणमध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. इराणमध्ये सुमारे पाच हजार जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी पातळीवर खबरदारी घेतली जात असताना अफवाही पसरत आहेत. स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, करोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी अनेकांनी मिथेनॉल प्राशन केले. त्यात २७ जणांचा मृत्यू झाला. जुंदिशापूर वैद्यकीय विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथेनॉल प्यायल्यामुळे २१८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिकप्रमाणात मिथेनॉल शरिरात गेल्यामुळे डोळ्यांना इजा होणे, दृष्टी जाणे, यकृत निकामी होण्यासारखे परिणाम होऊ शकतात. यामध्ये रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली. अल्कोहोल व इतर केमिकल घेतल्यामुळे करोनाचा संसर्ग होत नसल्याची अफवा मोठ्या प्रमाणावर इराणमध्ये पसरली आहे. त्यातूनच अनेकांनी अल्कोहोल, मिथेनॉल घेतले असल्याचे बोलले जात आहे.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार