Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus : भारतातील रुग्णांची संख्या ३९ पण सर्वांची प्रकृती स्थिर…

Spread the love

जगभर कोरोना व्हायरसने थैमान मांडलेले असतानाच भारतातही  करोनाची लागण झालेल्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून  केरळ राज्यात  या व्हायरसचे पाच नवे रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी ही माहिती दिलीआहे. या बरोबर भारतातील करोना रग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. या पाचही रुग्णांची चाचणी पॉझिटीव्ह आली असून हे पाचजण इटलीहून परतले होते. या परतलेल्या लोकांमुळे पठ्ठ्णमतिठ्ठा जिल्ह्यातील दोघांना या विषाणूंची लागण झाली.

दरम्यान चीनमधील वुहान शहारातून करोना विषाणू संपूर्ण जगात पसरला आहे. जगभरात आतापर्यंत ९० हजारांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर, आतापर्यंत तीन हजारांहून अधिक लोकांचा करोना विषाणूने बळी घेतला आहे.

उपलब्ध माहितीनुसार काल शनिवारी करोनाची लागण झालेले तीन नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर करोनाग्रस्तांचा संख्या ३४ झाली होती. ओमानहून परतलेल्या तामिळनाडूतील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली होती. या व्यतिरिक्त ईराणहून परकेल्या लडाखच्या दोन जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. अशा प्रकारे गेल्या २४ तासांच्या कालावधीत करोनाचे ८ नवे रुग्ण आढळले होते. केरळात लागण झालेल्या पाचही रुग्णांची  प्रकृती स्थिर आहे. या रुग्णांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि तिच्या नातेवाईकांचा समावेश आहे.

केरळमध्ये या पूर्वी करोनाचे तीन रुग्ण आढळले होते. ते सर्व बरे झाले आहेत. मात्र, आता आणखी ५ जणांना करोनाची लागण झाली आहे. यानंतर दिल्लीतही एक रुग्ण आढळला. शिवाय त्यांचे ओळखीच्या आणखी ६ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्षष्ट झाले. तसेच इटलीहून आलेल्या एकूण १८ लोकांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यात एक भारतीय नागिरक आणि १७ इटलीचे नागरिक होते. या व्यतिरिक्त, गुरुग्राम, गाझियाबाद, तेलंगण आणि तामिळनाडूत एक-एक करोनाग्रस्त आढळला आहे. तर लडाखमधील दोन लोकांनाही करोनाची लागण झाली आहे. सध्या देशात ३९ जणांना करोनाची लागण झाली असून पैकी तीन लोकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. म्हणजेच, सध्या भारतात करोनाच्या एकूण ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!