Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयातर्फे शिवणकाम प्रशिक्षण

Spread the love

पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिटी पोलिसींग आणि धवलक्रांती रीसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण व सबलीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मध्ये महिलांना तीन दिवसीय प्रोफेशनल टेलरिंग (शिवण काम )चे प्रशिक्षण देण्यासाठी नागपूर येथील प्रसिद्ध उद्योजक प्रमोद मानमोडे   यांच्या माध्यमातून अमरावती विद्यापीठातील दोन मास्टर ट्रेनर अनिता चौधरी आणि रत्नमाला मनोहर औरंगाबाद येथे प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या आहेत . सातारा परिसर ,सिद्धार्थ नगर, शताब्दी नगर ,आंबेडकर नगर, या भागातील एकूण ५० महिला या प्रशिक्षनाचा लाभ घेत आहेत तसेच यानंतर या प्रशिक्षण च्या माध्यमातून सर्व महिलांना स्वयंरोजगार व उद्योग उभारणीचे काम केले जाणार आहे या वेळी उपस्थित  पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे , डॉ किशोर उढाण  , राहुल तौर , धनराज चव्हाण ,नोमान खान , नागेश शिंदे ,योगेश मांडगे , योगेश भोजने , सौरभ चव्हाण , आदी उपस्थित होते

आपलं सरकार

Click to listen highlighted text!