Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : व्हाट्सऍप वर व्हिडीओ शेअर करताय ? तर सावधान , पोलीस करताहेत “हि” कारवाई….

Spread the love

दिल्लीच्या घटनेचे व्हिडिओ आढळले , दोघे पोलीसांच्या ताब्यात

एनआरसी, सीएएच्या मुद्द्यावरुन दिल्लीत अचानक हिंसाचार घडला. या घटनेचे पडसाद राज्यात उमटू नये. म्हणून तीन दिवसांपुर्वीच राज्यभरात हायअलर्ट करण्यात आले आहे. असे असताना शहरातील रिक्षा चालकाला आणि  त्याला भडकावू व्हिडीओ शेअर केलेल्या अशा दोघांना सिटीचौक पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी नाकाबंदीदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
दिल्लीतील घटनेचे पडसाद उमटू नयेत. म्हणून पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. बुधवारपासून शहरात नाकाबंदी करुन पोलीसांनी चौकाचौकात मोबाईलची तपासणी सुरू केली. गुरूवारी देखील नाकाबंदी सुरू असताना सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक प्रविण पाथारकर यांनी रिक्षाचालक परवेज शहा गणी (२५, रा. यासीननगर, हर्सुल) याच्या मोबाइलची तपासणी केली. तेव्हा पोलीसांना दिल्लीच्या घटनेचे प्रक्षोभक व आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले. त्यामुळे पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली. यादरम्यान त्याने मित्र मतीन शफिक शेख (३५, रा. संजयनगर, बायजीपुरा) याने व्हिडिओ व्हाटसअपवर पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर मतीन शेख याला देखील पकडण्यात आले. दोघांवर कारवाई करुन शेख अहमद शेख इलीयास यांच्या हमीपत्रावर दोघांना समज देऊन सोडण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!