Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : रेकाॅर्डवरचे दोघे गुन्हेशाखेकडून जेरबंद

Spread the love

औरंगाबाद – कुख्यात बाबला चा साथीदार आणि खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल असलेला एक अशा दोघांना गुन्हेशाखेने अटक केली आहे.
शेख सिकंदर शेख बशीर(३०) रा.टाऊनहाॅल जयभीमनगर आणि लखन रमेश सले (२९) रा.श्रीकृष्णनगर बेगमपुरा अशी अटक आरोपींची नावे आहेत. शेख.सिकंदर शेख बशीर हा नुकतीच जन्मठेप झालेल्या बाबला चा साथीदार आहे.यांनी बिस्मिल्ला काॅलनीतील प्लंबर शैख जब्बार शेख सत्तार यांचा खुन केला होता.गुन्हा घडल्यानंतर शेख सिकंदर जळगाव,बीड, सुरत या ठिकाणी लपून राहात होता. तो मिसारवाडीत येणार असल्याची माहिती खबर्‍याने गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांना दिली.त्यानुसार एपीआय अजबसिंग जारवाल यांनी सिकंदरला बेड्या ठोकल्या तर हर्सूल परिसरात लखन सले याने हर्सेल मधील नारायण लोखंडे यांना मार्च २०१९ चाकू हल्ला केला होता.पीएसआय विजय पवार हे पथचकासह गस्तीवर असतांना त्यांनी सले यास अटक केली.
वरील दोन्ही कारवाया गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.या कारवाईत शिवाजी झिने, प्रकाश साळुंके, राजेंद्र चव्हाण, विठ्ठल जवखेडे, किरण गावंडे, सुनिल बेलकर, संदीप सानप या कर्मचार्‍यांनी भाग घेतला होता.

वृदेचे मंगळसूत्र हिसकावले
औरंगाबाद – खिवंसरा पार्क मधून श्रीरामनगरात पायी जाणार्‍या वृध्देचे १लाख रु.किमतीचे २५ग्रॅम चे गंठण मोटरसायकलवर येणार्‍या भामट्यांनी पळवले.या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
निर्मला अशोक प्रामाणिक {७०) २५ ग्रॅम खिवंसरा पार्क असे फिर्यादीचे नाव आहे. त्या श्रीरामनगरकडे शुक्रवारी दुपारी पावणेपाच च्या सुमारास पायी निघाल्या असतांना मोटरसायकलवर येणार्‍या दोन भामट्यांनी प्रामाणिक यांचे मंगळसूत्र हिसकावले.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भरत पाचोळे करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!