Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कन्हैयाकुमारविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालविण्यास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची परवानगी

Spread the love

कम्युनिस्ट पार्टीचा नेता कन्हैय्या कुमार याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यास दिल्ली सरकारने मंजुरी दिली असल्याचे वृत्त एएनआय ने दिले आहे.  कन्हैय्या कुमार आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांविरोधात हा  खटला चालवण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकरणी भाजपच्या एका नेत्याने न्यायालयात याचिकाही दाखल केली होती परंतु न्यायालयाने ती फेटाळली होती.  दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात कथित देशविरोधी नारे दिल्याप्रकरणी हा खटला कन्हैय्या कुमार विरोधात चालणार आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला यासंबंधीची संमती देणारी फाईल ही गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कार्यालयात पडून होती मात्र केजरीवाल सरकारने आता यावर निर्णय घेतला आहे. ज्यामुळे कन्हैय्या कुमारवर देशद्रोहाचा खटला चालणार आहे.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ परिसरात २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यात  देशविरोधी  घोषणाबाजी करणाऱ्यांचे व्हिडीओ समोर आले होते.  जेएनयूच्या विद्यार्थी परिषदेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांविरोधात या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!