Aurangabad : लाचखोर पोलिसांवर जालन्याच्या एसीबी कडून ट्रॅप, दोघांना बेड्या

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद -फिर्यादीच्या आई वडलांना फसवणूकीच्या गुन्ह्यात जामिन मिळवून देणे व आरोपी न करण्यासाठी १५ हजार रु.ची लाच मागणार्‍या क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांना जालना येथील एसीबी च्या पथकाने अटक केली. आरोपी पोलिस शहरातील एसीबी कर्मचार्‍यांना ओळखंत असल्याने जालना पोलिसांकडे या कारवाईची जबाबदारी देण्यात आली होती.
या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , रमेशलाल जैस्वाल (५०) आणि गोपाल सोनवणे असे अटक आरोपींची नावे आहेत. या दोघांना  काल १५ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघेही क्रांतीचौक पोलिस ठाण्यात कर्मचारी म्हणून काम करतात. फिर्यादीने वरील दोन्ही आरोपींच्या बाबतीत एसीबी कडे तक्रार केल्याची कुणकुण जैस्वाल आणि सोनवणे यांना लागली होती. वरील दोन्ही आरोपी ट्रॅप होऊ नये म्हणून प्रयत्न करंत होते.   हा सर्व प्रकार एसीबी चे पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांना कळल्यानंतर त्यांनी जालना एसीबीचे पोलिस निरीक्षक संग्राम ताठे आणि उपअधिक्षक रविंद्र निकाळजे यांना आदेश देऊन आरोपींवर कारवाई केली.

Advertisements

आपलं सरकार