Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#DelhiViolence NewsUpdate : गृहमंत्र्यांनी नियोजित दौरा रद्द करून घेतली बैठक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडून दंगलग्रस्त भागांना भेट

Spread the love

केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याच्या वतीने देशातील सर्व खासगी वृत्त वाहिन्यांसाठी विशेष पत्र पाठविले असून या पत्रात केंद्र सरकारच्या वतीने म्हटले कि , प्रसारित केला जाणारा मजकूर काळजीपूर्वक दिला जावा. कोणताही असा मजकूर जाणार नाही कि , ज्यामुळे देशाची शांतता , कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल. कुठल्याही समाजात जातीय आणि धार्मिक त्तेध निर्माण होईल असा कोणताही मजकूर प्रसिद्ध करू नये किंवा दाखवू नये.

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जामिया मिलिया इस्लामिया , एएजेएमआय आणि जामिया कोआर्डीनेट कमिटीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर जाऊन दिल्लीतील दंगेखोरांवर कडक कारवाईची मागणी करीत दिल्लीत शांतता स्थापन करावी असे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी दिल्लीच्या शांततेसाठी राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीजवळ धरणे धरली होती. यावरून अरविंद केजरीवाल यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असताना लोकांमध्ये जाऊन किंवा प्रशासनाला आदेश देऊन दिल्ली शांत करण्यापेक्षा मुख्यमंत्रीच धरणे धरीत आहेत हि गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचे ट्रोलर्सनी म्हटले आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पोलीस अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन दिल्लीला शांत करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर सोपविल्याचे दिसत आहे. दरम्यान अमित शहा यांच्या बैठकीनंतर अजित डोवाल यांनी दिल्लीतील दंगलग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या बैठकीनंतर पोलिसांनीही आपली तत्परता दाखवत दिल्लीतील महत्वाचे रस्ते क्लियर केल्याचा दावा केला.

सीएए, एनआरसी आणि एनपीआरवरून दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराचे स्वरूप अधिक तीव्र होत असल्याने या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलीस आणि प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तीन तास मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत शहा यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला  दिल्लीचे नवनियुक्त विशेष पोलीस आयुक्त एस.एन. श्रीवास्तवही उपस्थित होते.

दरम्यान दिल्लीतील वाढता हिंसाचार पाहता अमित शहा यांनी तिरुवनंतपूरमचा दौरा रद्द केलाय. पद्म विभूषण पी. परमेश्वरनजी यांच्या प्रार्थना सभेसाठी ते केरळला जाणार होते. अमित शहा यांनी गेल्या २४ तासांत घेतलेली ही तिसरी बैठक होती. जवळपास तीन तास ही बैठक चालली. या बैठकीत दिल्ली पोलीसमधील वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय गृहमंत्रालयाचे अधिकारी होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि विविध वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दगडफेकीत १८० हून अधिक जण जखमी झालेत. दिल्ली पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे. दिसताच क्षणी गोळी घालण्यात येईल, अशी घोषणा दिल्ली पोलिसांकडून हिंसाचारग्रस्त भागात केली जातेय. हिंसाचारामुळे ईशान्य दिल्लीतील शाळा, कॉलेज उद्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. तर सीबीएसईने या भागातील १०वी आणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!