Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

असंवेदनशील आणि दूरदृष्टीचा अभाव असलेले नेते सत्तेत आल्यामुळे जनतेला त्याची किंमत चुकवावी लागतेय, पी. चिदंबरम

Spread the love

असंवेदनशील आणि दूरदृष्टीचा अभाव असलेले नेते सत्तेत आल्यामुळे जनतेला त्याची किंमत चुकवावी लागतेय, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे . सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत सरकारने सीएए रोखायला हवा होता. तसेच  सीएए समर्थक आणि विरोधकांचे म्हणणे ऐकायला हवे होते, असे  चिदम्बरम यांनी म्हटले आहे.  नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) तीन दिवसांपासून दिल्लीत हिंसाचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी सीएएवरून केंद्र सरकारवर हि टीका केली आहे.

यासंदर्भात आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , दिल्लीत सुरू असलेला हिंसाचार आणि त्यात अनेकांच्या मृत्यू झाल्याने यामुळे स्तब्ध झालोय. या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला पाहिजे. असंवेदनशील आणि दूरदृष्टीचा अभाव असलेले नेते सत्ते आल्यामुळे जनता आता त्याची किंमत चुकवत आहे. भारतात नागरिकत्व कायदा १९५५ मध्ये लागू झाला होता. त्यात कधी दुरुस्तीची गरज पडली नाही. मग आताच कशी नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती गरज पडली? नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती रद्द केली गेली पाहिजे.

दरम्यान अजूनही उशिर झालेला नाही. सीएएला विरोध करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घ्यावा. आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कायद्याची वैधता रोखण्याची घोषणा सरकारने करावी. सीएएवरून काँग्रेसने सरकारला सावध केलं होतं. सीएएमुळे समाजात फूट पडू शकते. त्याला रद्द करणं किंवा अंमलबजावणी करणं सोडून दिलं पाहिजे. पण आमच्या इशाऱ्याकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं, असं चिदम्बरम म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!