Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : सुरक्षारक्षक कंपनीला कर्मचाऱ्यांनीच लावला दीड कोटींचा चुना, एकास अटक , महिला सहकारी फरार

Spread the love

महिला आरोपीची हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव, एक कोटी रु. जमा केल्यास अटकपूर्व जामिन – हायकोर्टाचे आदेश

औरंगाबाद – सुरक्षारक्षक कंपनीला दीड कोटी रुपयांना चुना लावणार्‍या लेखाधिकार्‍याला आर्थिक गुन्हेशाखेने मंगळवारी बेड्या ठोकल्या.त्याला कोर्टासमोर उभे केले असता २८ फेब्रूवारी पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणातील त्याची महिलासाथीदार अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात प्रयत्न करत असतांना कोर्टाने महिला आरोपीला १ कोटी रु. आधी  जमा करा असा आदेश देताच महिला आरोपी पतीसह फरार झाली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात आॅक्टोबर २०१९ मधे गुन्हा दाखल झालेला आहे.

या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , ओमप्रकाश प्रसादसिॅग (४५) रा.छावणी असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्यासोबतची संशयित महिला आरोपी फरार आहे. २००४ साली धनंजय गोटे यांनी एसएमके सेक्पूरिटी नावाची सुरक्षारक्षक पुरवठा करणारी कंपनी सुरु केली. या कंपनीमधे व्यवस्थापकिय संचालक म्हणून कारभारी जाधवर यांना नियुक्त केले आहे. २००९ साली जाधवर यांनी संशयित महिला आणि ओमप्रकाश प्रसादसिंग यांची नियुक्ती केली. २०१३ साली या सेक्पूरिटी कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रुपांतर झाले. जालनारोडवरील अमरप्रित चौकातील आनंदप्लाझा येथे कंपनीचे कार्यालय आहे. सादर संशयित आरोपी महिला कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी तर ओमप्रकाश हा लेखाधिकारी म्हणून काम पाहात आहेत. कंपनीचे आर्थिक व्यवहार एस.बी.आय. आणि बॅंक आॅफ बडोदा मार्फत केले जातात. दरम्यान  २०१८ साला पासून  संशयित महिला आरोपी आणि ओमप्रकाश यांनी व्यवस्थापकिय संचालक कारभारी जाधवर यांच्या खोट्या सह्या करंत दीड कोटी रु.हडप केले आणि  कर्मचार्‍यांचे भविष्य निर्वाह निधी आणि इ.एस.आय.एस.चे २६ लाख रु. भरले नाहीत. बॅंक आफ बडोदा ने सेक्यूरिटी कंपनीशी पत्रव्यवहार करुन भविष्य निर्वाह निधी आणि इ.एस. आय.सी.चे कर्मचार्‍यांचे पैसे  भरले नसल्याचा खुलासा केला.

कंपनीने चार्टर्ड अकाउंटंट मार्फत कंपनीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची खात्री करुन घेतली. त्यानंतर जाधवर यांनी संशयित महिलेलच्या पतीच्या कानावर कंपनीने वरील प्रकार घातल्यानंतर तिच्या पतीने आपल्या पत्नीला त्रास दिल्यास पोलिसांकडे जाऊ अशी धमकी दिली होती. महिला आरोपी ऐकत नसल्याचे कळताच आॅक्टोबर २०१९ मधे उस्मानपुरा पोलिस ठाण्यात जाधवर यांनी फसवणूकीची तक्रार दिली. परंतु पोलिसआयुक्तांच्या आदेशाने हा गुन्हा एक महिन्यापूर्वी आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला. वरील कारवाई पोलिस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अजय सूर्यवंशी, पोलिस कर्मचारी महेश उगले पुढील तपास करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!