Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यात भारताचा २१ हजार कोटींचे दोन अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स घेण्याचा महत्वपूर्ण करार….

Spread the love

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज चर्चा झाली. या दौऱ्यात मोठ्या संरक्षण करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही नेते आणि शिष्टमंडळांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर ट्रम्प आणि मोदी यांनी पत्रकारांपुढे संयुक्त निवेदन दिलं. त्याच बरोबर दोन्ही देशांमध्ये पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारत आणि अमेरिके दरम्यानचा हा सर्वात मोठा संरक्षण करार आहे. या करारामुळे भारताची संरक्षण क्षमता वाढणार असून अमेरिकेलाही मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

या निमित्ताने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले, भारतातल्या स्वागताने मी भारावून गेलो आहे. माझ्यासाठी आणि मेलेनियासाठी हा दौरा संस्मरणीय ठरला आहे. या भेटीमुळे दोन्ह देशांचे संबंध नव्या उंचीवर गेल्याचंही त्यांनी सांगितलं. तर भारत आणि अमेरिकेतल्या मैत्रीचं नवं पर्व सुरू झाल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.

पीएनबीने दिलेल्या माहितीनुसार या संरक्षण करारामुळे भारत अमेरिकेकडून 6 AH-64E अपाचे आणि ‘MH60 रोमियो’ ही दोन अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स अमेरिकेकडून भारताला मिळणार आहे. हा २१ हजार कोटींचा करार असला तरी याच खरेदीवर तब्बल १८ हजार कोटी खर्च होणार आहेत. तर अत्याधुनिक रडार यंत्रणाही भारताला देण्यासाठी अमेरिका इच्छुक आहे. मात्र भारत त्यासाठी राजी झालेला नसून अशी यंत्रणा रशिया भारताला देणार आहे.

दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यात  प्रामुख्याने तीन मुख्य सामंज्यस्य करार (MoU ) करण्यात आले असून त्यात मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात सहकार्य आणि संशोधन, वैद्यकीय उपकरणांची सुरक्षितता, दोन्ही देशांमधल्या बड्या तेल कंपन्यांमध्ये सहकार्य यांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!