लग्नाला नकार दिला म्हणून डोक्यात घातला दगड …

Advertisements
Advertisements
Spread the love

महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाहीत . बीड शहारत , लग्नाला नकार दिला म्हणून एका माथेफिरूने तिच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी पेठ भागात घडली. पीडित जखमी महिला घटस्फोटित आहे.

Advertisements

या प्रकरणात पोलिसांनी दिलेली , सुनील दत्तात्रय जाधव असे आरोपीचे नाव आहे. सुनील जाधव याचे महिलेवर एकतर्फी प्रेम आहे. या एकतर्फी प्रेमातून सुनीलने महिलेवर हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बीड शहरातील पेठ बीड पोलिस स्टेशनच्या एमआयडीसी भागात राहणाऱ्या २३ वर्षीय घटस्फोटीत महिलेच्या डोक्यात दगड घालण्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता घडली. यावेळी पीडित महिलेने सांगितले की, मागील एक वर्षांपासून सुनील तिची छेड काढत होता. यापूर्वी तिने सुनीलविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी सुनीलला पोलिस स्टेशनमध्ये बोलावून समजही दिली होती. तरी देखील तो महिलेची छेड काढत होता. एवढेच नाही तर त्याने तिला लग्नाची मागणी घातली होता. सुनीलच्या त्रासाला कंटाळून तिला ब्युटी पार्लरचा क्लास अर्ध्यात सोडावा लागला होता.

Advertisements
Advertisements

सदर पीडित महिला घटस्फोटीत आहे. ती सध्या वडिलांकडे राहते. ‘मागील एक वर्षभरापासून सुनील जाधव हा माझ्या मुलीला सतत छेडतो व आता तर त्याने डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलीच्या जीवितास धोका असून याची दखल बीड पोलिसांनी घ्यावी, अशी मागणीही पीडित महिलेच्या वडिलांनी केली आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पेठ बीड पोलिस स्टेशनमध्ये सुरू आहे.

आपलं सरकार