Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डोनाल्ड ट्रम्प च्या “कोटीवर ” राम गोपाल वर्मांचा ट्विटवार ….

Spread the love

‘माझ्या पहिल्या भारत दौऱ्यात एक कोटी लोक स्वागत करतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितलं आहे,’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या या दाव्यावर ट्विट करत बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यानं उपरोधिक टोला लगावला आहे.

ट्रम्प यांच्या दाव्याची खिल्ली उडविताना राम गोपाल वर्मा यांनी  त्यांच्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘ हे नक्कीच होऊ शकतं, अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, शाहरूख खान, कटरीना कैफ, दीपिका पादुकोण आणि सनी लियोनी यांना ट्रम्प यांच्या बाजूला उभं केल्यासं हे शक्य आहे’.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी मंगळवारी मेरीलँड इथं पत्रकारांशी बोलताना ‘विमानतळापासून कार्यक्रमस्थळापर्यंत ७० लाख लोक स्वागतासाठी उपस्थित असतील,’ असं म्हटलं होतं. त्यात त्यांनी गुरुवारी ३० लाखांनी वाढ करीत ‘माझ्या स्वागतासाठी एक कोटी लोक उपस्थित राहणार आहेत, असं एकलं आहे. विमानतळापासून जगातील सर्वांत मोठ्या मोटेरा स्टेडियमपर्यंत ६० लाख ते एक कोटी लोक स्वागतासाठी उपस्थित असतील,’ असं ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, अहमदाबाद महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, शहराची एकूण लोकसंख्या जवळपास ७० लाख इतकी असल्याचे म्हटलं आहे. ‘विमानतळ ते मोटेरा स्टेडियम या २२ किलोमीटरच्या मार्गावर मोदी व ट्रम्प यांच्या रोड शोदरम्यान एक ते दोन लाख लोक उपस्थित राहू शकतात,’ असं महानगरपालिकेचे आयुक्त विजय नेहरा यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!