Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Donald Trumph : मिलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रम पत्रिकेतून नावे वगळल्याने केजरीवाल असणार नाहीत

Spread the love

केंद्र सरकारने मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांचे नाव  कार्यक्रमातून काढून टाकल्याने  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मिलेनियासमवेतच्या दिल्लीच्या शासकीय शाळेच्या दौर्‍यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे  सहभागी होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.  आधीच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार, केजरीवाल आणि सिसोदिया हे दोघेही अमेरिकन फर्स्ट लेडीसमवेत शाळेच्या या दौर्‍यात सहभागी होणार होते परंतु कार्यक्रम पत्रिकेत थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचेच नाव वेगळ्याच आरोप आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान दि. २५ फेब्रुवारी रोजी मिलेनिया दक्षिण दिल्लीतील एका सरकारी शाळेत हॅपीनेस क्लास पाहायला जात आहेत. रात्री १२ च्या सुमारास मेलेनिया या शाळेला भेट देतील. त्या या शाळेत सुमारे एक तास घालवतील आणि मुलांना भेटतील. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक सुरू असताना, त्या मुलांची भेट घेणार आहेत. अमेरिकेची प्रथम महिला पहिल्यांदाच अशा प्रकारे दिल्लीतील एका शाळेतील विद्यार्थ्यांना भेटणार आहे.

दरम्यान सन २०१० मध्ये ओबामा जेव्हा भारत दौर्‍यावर आले होते तेव्हा त्यांची पत्नी मिशेल ओबामा या मुला-मुलींना मुंबईत भेटल्या होत्या. सन २०१८ मध्ये केजरीवाल सरकारने दिल्लीच्या शाळांमध्ये हॅपीनेस क्लास सुरू केला. हा वर्ग नर्सरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मुलांचा मानसिक ताणतणाव दूर करणे हा त्याचा हेतू आहे. हॅपीनेस क्लासच्या मदतीने मुलांच्या वागणुकीत खूप सकारात्मक बदल झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!