Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपनेते भागवत कराड यांच्या वाहनांची तोडफोड कोणी आणि का केली ?

Spread the love

मराठवाडा विकास महामंडळचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या कारची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. शहरातील नुतन कॉलनी भागात कराड यांचे घर असून घरासमोरील कार पार्किंगमध्येच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, किशनचंद तनवाणी समर्थक सचिन जवेरी, संतोष सुरे यांनी हल्ला केला, मी स्वतः डोळ्याने पहिले असल्याचा असा आरोप भागवत कराड यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून अधिक चौकशी करण्यात येत आहे.

भाजप नेते डॉ. कराड यांनी पुढे सांगितले कि , सायंकाळी सात साडेसहा  वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरी राहत्या घरी कार्यकर्त्यांशी बोलत होते. त्याचवेळी हर्सुलचे कार्यकर्ते रंगनाथ राठोड त्यांना भेटायला आले . राठोड माझ्याशी बोलता असताना बाहेर सचिन जवेरी, संतोष सुरे यांनी आपल्या दोन वाहनांवर दगडफेक केली, यात वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. आमदार अतुल सावे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारीही मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहचले आहेत.

कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार  त्यांच्या घरावर दुचाकीवर आलेल्या ८ ते १० जणांनी अचानकपणे दगडफेक केली. या दगडफेकीत कराड यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. दगडफेक करून अज्ञात तरुण पसार झाले. या घटनेनंतर डॉ.भागवत कराड, आमदार अतुल सावे, भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्यासह भाजप शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी पोहोचले. तत्पूर्वी क्रांतिचौक पोलीस ठाण्यातही आरोपींना अटक करण्याची मागणी भाजपच्या या शिष्टमंडळाने केली.

दरम्यान  औरंगाबाद महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण बरंच तापलं आहे. त्यातच भाजपचे नेते किशनचंद तनवाणी यांनी  भाजपसोडून  पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत काही नगरसेवकही शिवसेनेत गेले आहेत. या घडामोडींनंतर स्थानिक पातळीवर शिवसेना व भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. या संघर्षातूनच कराड यांच्या घरावर हल्ला झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

दरम्यान, भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या समर्थकांनीच  हा हल्ला केल्याचा थेट आरोप भागवत कराड यांनी केला आहे. किशनचंद तनवाणी यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या सेनाप्रवेशावर कराड यांनी तनवाणी यांच्यावर केलेल्या टिकेवरून हा हल्ला झाला असल्याचे मत भाजप नेत्यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या टीकेनंतर आज कराड यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली. दरम्यान सचिन झवेरी याने फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये ‘ज्याला स्वत:चे घर सांभाळता येत नाही तो भागवत कराड वर्तमानपत्रात अक्कल पाजळतोय, यापुढे कमरेखालेच वार होतील’ असा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये शहर अध्यक्ष बदलण्यात आला होता. याच निर्णयातून कराड यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा, अशी भाजपच्या गोटात नेते चर्चा करत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!