Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एमआयएमच्या सभेत पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्या तरुणीला न्यायालयीन कोठडी , जाणून घ्या हि तरुणी आहे कोण ?

Spread the love

कर्नाटकात  बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एमआयएमच्या सभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे . या तरुणीचं नाव अमूल्या लियोना असे  आहे.  ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मसलमीन’ एएमआयमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासमोरच  अमूल्यानं या घोषणा दिल्या होत्या.  पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या अमूल्याला थांबवण्याचा ओवेसी आणि आयोजकांनी प्रयत्न केला. परंतु, ती थांबली नाही. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून अमूल्या हिला ताब्यात घेतलं. त्यानंतर अमूल्या हिला बंगळुरूच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने  तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


अचानक उद्भवलेल्या या प्रकरणामुळे आयोजकांसह खासदार असदुद्दीन ओवेसीही गोंधळून गेले. यानंतर खा.ओवेसी यांनी या घटनेची तत्काळ मंचावरूनच निंदा केली. ते म्हणाले कि , ‘शत्रू देशाच्या पक्षात दिल्या जाणाऱ्या घोषणांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. आम्ही याची निंदा करतो. घडलं ते चुकीचंच होतं’ असं म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी वेळीच परिस्थिती सावरली. दरम्यान, अमूल्याच्या वडिलांनीही आपल्या मुलीचं कृत्य चुकीचंच होतं, अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ही घटना घडत असताना ओवेसींनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले कि , मी नामजला जात असताना या मुलीच्या घोषणा ऐकून परत फिरलो मी सभेला संबोधित करणार होतो. त्या पूर्वीच या मुलीने आक्षेपार्ह घोषणा दिल्या. मी तिच्याकडे जाऊन तिला थांबवले. हे काय आहे ?… आप क्या बकवास कर रहे हैं?… मी ही बाब सहन करणार नाही, असे आपण त्या मुलीला म्हटल्याचे ओवेसी यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या घोषणा देणारी हि तरुणी आहे तरी कोण ? 

दरम्यान एमआयएमच्या स्टेजवर जाऊन ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारी हि तरुणी  तरी कोण असा प्रश्न उपस्थित केला जात असताना मिळालेली माहिती अशी कि , या तरुणीचे नाव अमूल्या लियोना असून तिचे शालेय शिक्षण नॉरबेट सीबीएसई स्कूल आणि मणिपालच्या क्राईस्ट स्कूलमध्ये झालेले आहे. बंगळुरूच्या एनएमकेआरव्ही महिला महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. ती एक ब्लॉगर म्हणूनही ओळखली जाते. ‘अलनोरोन्हा’ नावाचं तिचं एक फेसबुक पेजही असून  बंगळुरूच्या एका रेकॉर्डिंग कंपनीत तिने अनुवादक म्हणूनही कामही केले आहे.

३१ जुलै २००० ला कर्नाटकच्या मैसूमध्ये अमूल्याचा जन्म झाला. अवघ्या २० वर्षांची अमूल्या सध्या सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह दिसते. NMKRVCW मधून तिनं बी.ए.जर्नालिझमचं शिक्षण घेतलं. तिला अभ्यासासोबत कविता लिहिण्याचाही छंद आहे. यापूर्वीही जानेवारी महिन्यात मंगळुरू एअरपोर्टवर ‘पोस्टकार्ड न्यूज’चे सह-संस्थापक महेश विक्रम हेगडे यांच्याकडे काही महिला ‘वंदे मातरम’ गाण्याची मागणी करताना दिसली होती. या घटनेचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.

दरम्यान “पाकिस्तान झिंदाबाद”ची घोषणा देणाऱ्या अमूल्या लियोन हिचे वडीलही  तिच्यावर संतापले आहेत. अमूल्याने जे काही म्हटले आहे ते चुकीचेच आहे, ते मी कधीही सहन करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया अमूल्याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.  “माझ्या मुलीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील कार्यक्रमात जे काही केले ते बिलकुल समर्थनीय नाही. ती जे काही म्हटली ते सहन करण्याजोगे नाहीच, असे अमूल्याचे वडील म्हणाले. मुस्लिम लोकांशी संबंध ठेवू नको, असे मी माझ्या मुलीला नेहमीच सांगत आलो आहे. मात्र तिने ते ऐकले नाही. प्रक्षोभक वक्तव्य करू नको असे मी तिला सतत सांगत आलो आहे, मात्र तिने माझे ऐकले नाही, असेही ते म्हणाले.

अमूल्याच्या वडील आपले मत व्यक्त करताना पुढे म्हणाले की, ‘माझी तब्येत बरी नाही. मला हृदयविकाराचा त्रास आहे. फोनवर बोलताना तिने मला तब्येतीची काळजी घ्या असे सांगितले आणि फोन कट केला. तेव्हा पासून तिचे नि माझे बोलणे झालेले नाही. दरम्यान अमूल्याचे वडील मीडियाशी बोलत असताना त्यांच्या आसपास उभे असलेल्या टोळक्यातील एका व्यक्तीने त्यांच्याशी गैरव्यवहारही केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!