Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंतप्रधानांना भेटल्यानंतर काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ?

Spread the love

आपल्या नियोजित दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन , सीएएला कुणी घाबरण्याचे  कारण नाही, असे स्पष्टीकरण  उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मोदींच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात किमान सव्वा तास चर्चा झाली.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत खा. संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि , पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सीएए, एनपीआर आणि एनआरसीवर चर्चा झाली. सीएएमुळे कुणी घाबरण्याचं कारण नाही. सीएएद्वारे शेजारील देशात अल्पसंख्यांक असलेल्यांना नागरिकत्व देण्यात येतं. सीएएने कुणाचं नागरिकत्व काढण्यात येणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. एनपीआरमध्ये काही गडबड असले तर त्यावेळी निर्णय घेऊ. तसेच एनआरसी हे देशभरात  लागू करण्यात नसल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

चर्चेतील तिन्हीही मुद्द्यांशिवाय पंतप्रधान मोदींशी राज्याचा निधी आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. केंद्राकडून राज्य सरकारला मिळणारा जीएसटीचा वाटा हा उशिराने येतो. तो वेळेत मिळावा, अशी मागणी आपण पंतप्रधान मोदींकडे केल्याचे  उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच  राज्यपाल आणि सरकामध्ये कुठलाही वाद नसल्याचे  स्पष्टीकरणही  उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं.

पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी रवाना झाले. सोनिया गांधींच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये  तासभर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची भेट घेतली आणि ते  केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्यासाठी रवाना झाले.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!