Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“सायनाईड मोहन” : आधी मैत्री , मग प्रेमाचे नाटक आणि शेवटी खून , तब्ब्ल २० महिलांना सायनाईडची गोळी देणारा क्रूरकर्मा…

Spread the love

तब्ब्ल २० महिलांचा खून करून ‘सायनाइड’ नावाने कुख्यात झालेल्या  मोहन नावाच्या गुन्हेगाराला १९ व्या बलात्कार आणि खून प्रकरणात  केरळमधील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मोहन सायनाइडवर २० महिलांवर बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप आहे. एकूण २० प्रकारणांपैकी हत्या आणि बलात्कार केल्याचे हे १९ वे प्रकरण आहे .  मोहन सगळ्यात आधी महिलांशी मैत्री करायचा, त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा आणि नंतर  त्यांच्यावर बलात्कार करून  साइनाइडची गोळी देऊन त्यांची हत्या करायचा.

केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला सोमवारी “सायनाइड” नावाने हि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षेबरोबरच त्याला २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. इतर अनेक प्रकरणांमध्येही तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

याबाबत पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या आधीही आरोपी मोहनला अशाच ५ प्रकरणांपैकी  ३ प्रकरणांमध्ये जन्मठेप आणि २ प्रकरणांमध्ये मृत्यूदंडाची  शिक्षा देण्यात आली होती त्यापैकी फाशीची शिक्षा जन्मठेपेत  बदलण्यात आली आहे. ताज्या निकालानुसार मोहन याची एका २३ वर्षीय मुलीशी मंगळुरुमधील कॅम्पको  युनिटमध्ये कामाच्या संदर्भात भेट झाली होती या भेटीचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. पुढे मैत्री आणखी वाढल्यानंतर त्याने या मुलीला लग्नाचा प्रस्ताव दिला. यानंतर दोघेही २ जानेवारी २००६ रोजी म्हैसूर येथील बसस्थानकाजवळील लॉजमध्ये थांबले. त्या रात्री त्यांच्यामध्ये संबंध झाले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने मुलीचे सर्व दागिने काढून लॉजमध्ये ठेवले आणि नंतर बाहेर फिरण्यासाठी गेले. त्यानंतर मोहनने बसस्थानकात मुलीला सायनाइडची गोळी दिली . हि गोळी गर्भनिरोधक असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान मुलने गोळी खाल्ली आणि ती शौचालयाच्या दिशेने पळत असतानाच ती खाली पडली. जेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा तिला मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर मोहन पुन्हा लॉजमध्ये आला आणि सर्व दागिने घेऊन पळून गेला. यानंतर मोहनला २००९ मध्ये कर्नाटकमधील बंटवाल इथून अटक करण्यात आली होती, जेव्हा त्याने बलात्कारानंतर सायनाइड देऊन २०व्या महिलेची हत्या केली होती.

कुख्यात सीरियल किलर सायनाइड मोहनचे खरं नाव मोहन कुमार आहे. सायनाइड मोहनचा जन्म कर्नाटकात १९६३ मध्ये झाला होता. मोहन अनेकदा स्त्रियांना लग्नाचं आमिष दाखवून आणि त्यांची हत्या करुन दागिने लुटून फसवत असे. तो लग्नाचा बहाणा करून स्त्रियांशी संबंध ठेवण्याचं नाटक करायचा आणि मग गर्भनिरोधक गोळी खायला घालण्याच्या बहाण्याने स्त्रियांना सायनाईड द्यायचा. मोहनने २००५ ते २००९ या  दरम्यान त्याच्यावर  २० मुलींची हत्या आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!